घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनी रॉय कान्समध्ये पोहोचली, दिसला ग्लॅमरस लूक; दिशा पाटनीची कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 11:22 IST2026-05-19T11:22:10+5:302026-05-19T11:22:34+5:30

मौनी रॉयचे फोटो अन् दिशा पाटनीची 'ती' कमेंट

mouni roy attended cannes film festival amid her divorce first look grabs attention | घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनी रॉय कान्समध्ये पोहोचली, दिसला ग्लॅमरस लूक; दिशा पाटनीची कमेंट

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनी रॉय कान्समध्ये पोहोचली, दिसला ग्लॅमरस लूक; दिशा पाटनीची कमेंट

अभिनेत्री मौनी रॉय एकीकडे घटस्फोटामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे ती नुकतीच कान्स फिल्म फेस्टिवलला गेली आहे. कान्समधील मौनीचा लूक समोर आला आहे. तिने ग्लॅमरस फोटो पोस्ट करत कान्सला पोहोचल्याचं सांगितलं आहे. यावर दिशा पाटनीच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण मौनीच्या घटस्फोटाला दिशाच जबाबदार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरुन आहे.

मौनी रॉय काल मुंबई विमानतळावर दिसली होती. तिने पापाराझींसमोर पोज देणंही टाळलं होतं. तर आता तिचे कान्समधून फोटो समोर आले आहेत. फ्रेंच रिवेरा येथे ती स्टायलिश लूकमध्ये दिसली. ब्लॅक फिटेड मिनी ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. ज्यावर एक पांढरी हॉल्टर नेकलाइन आहे. यावर तिने लांब डार्क कोट घातला आहे जो आउटफिटला आणखी बहार आणत आहे. सोबतच शीयर स्टॉकिंग्स आणि ब्लॅक बूट्स घातले आहेत. तिचा पूर्ण लूक विंटर फॅशनची एलिगंट व्हाइब देत आहे.


नेटकऱ्यांनीही तिच्या लूकचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिला ट्रोलही केलं आहे. 'इकडे घटस्फोट, तिकडे व्हेकेशन','बास एवढं श्रीमंती व्हायचं आहे','तुला घटस्फोटाचं दु:ख तर आहे ना?' अशा कमेंट्सही नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

मौनीच्या या पोस्टवर तिची बेस्ट फ्रेंड दिशा पाटनीनेही कमेंट केली आहे. 'लेट्स गो गर्ल' असं तिने लिहिलं आहे. या कमेंटवरुनही नेटकरी दोघींनी ट्रोल करत आहेत. मौनीच्या घटस्फोटामागे तिचं दिशा पाटनीसोबतचंच नातं असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. दोघींचा एका मंदिरात गळ्यात हार घातलेला जुना फोटोही व्हायरल करण्यात येत आहे. मात्र आपल्या घटस्फोटात कोणाही तिसऱ्या व्यक्तीचा संबंध नाही असं मौनीचा एक्स हसबंड बिझनेसमन सूरज नांबियारने स्पष्ट केलं आहे. सध्या मौनीचं वैयक्तिक आयुष्य चांगलंच चर्चेत आलं आहे. 

 

Web Title : तलाक की अफवाहों के बीच मौनी रॉय कान्स में; दिशा पाटनी की टिप्पणी

Web Summary : तलाक की अफवाहों के बीच, मौनी रॉय का ग्लैमरस कान्स लुक चर्चा में है। दिशा पाटनी की टिप्पणी ने तलाक में उनकी भूमिका के बारे में अटकलों के बीच ध्यान आकर्षित किया। रॉय के स्टाइलिश लुक की प्रशंसा और ट्रोल किया गया। उनके पूर्व पति ने तीसरे पक्ष के शामिल होने से इनकार किया।

Web Title : Amidst Divorce Rumors, Mouni Roy at Cannes; Disha Patani's Comment

Web Summary : Amidst divorce rumors, Mouni Roy's glamorous Cannes appearance sparks buzz. Disha Patani's comment draws attention amid speculation about her involvement in the divorce. Roy's stylish look is praised and trolled. Her ex-husband denies third-party involvement.