६० वर्षीय मिलिंद सोमण यांनी रचला इतिहास, युरोपातून आफ्रिकेत पोहत गेले; पोस्ट शेअर करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 19:24 IST2026-05-06T19:10:28+5:302026-05-06T19:24:13+5:30
मिलिंद सोमण हे यावेळी थेट युरोपातून आफ्रिकेत पोहत गेले.

६० वर्षीय मिलिंद सोमण यांनी रचला इतिहास, युरोपातून आफ्रिकेत पोहत गेले; पोस्ट शेअर करत म्हणाले...
Milind Soman : अभिनेते मिलिंद सोमण त्यांच्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असतात. ते चाहत्यांसाठी नेहमी सोशल मीडियावर फिटनेससंदर्भातील विविध व्हिडीओ शेअर करत असता. दरम्यान, मिलिंद यांनी अलीकडेच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांना चकीत केले आहे. या व्हिडीओमध्ये ते अशी गोष्ट करताना दिसत आहेत, ज्याचा कुणी विचारही करणार नाही. मिलिंद सोमण हे यावेळी थेट युरोपातून आफ्रिकेत पोहत गेले.
मिलिंद सोमण यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, "१ मे रोजी मी पोहत युरोपमधून आफ्रिकेत गेलो. जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडली. स्पेनमधील टारिफा(Tarifa) ते मोरोक्कोचा समुद्रकिनारा यांच्यात १५ किलोमीटरचे अंतर आहे. पोहण्याचा हा अनुभव खूपच सुंदर व अप्रतिम होता. याबद्दल लवकरच सविस्तर पोस्ट शेअर करेन".
मिलिंद यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते अत्यंत उत्साहात दिसत आहेत. एका फोटोत त्यांनी दोन्ही हातात भारताचा ध्वज पकडला आहे, तर एका व्हिडीओमध्ये ते अथांग समुद्रात पोहोताना दिसत आहेत. ६० वर्षांचे असूनही मिलिंद सोमण यांचा हा फिटनेस आणि जिद्द पाहून चाहते चकीत झाले आहे.