२ महिन्यात मोडला मनोज बाजपेयी यांचा पहिला संसार, 'या' एका कारणामुळे पत्नी गेली सोडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 10:11 IST2026-04-25T10:10:16+5:302026-04-25T10:11:03+5:30

Manoj bajpayee: मनोज वाजपेयी यांचं लव्ह मॅरेज असूनही त्यांचा पहिला संसार मोडला.

manoj-bajpayee-first-marriage-divorce-reason-shabana-raza-is-his-second-wife | २ महिन्यात मोडला मनोज बाजपेयी यांचा पहिला संसार, 'या' एका कारणामुळे पत्नी गेली सोडून

२ महिन्यात मोडला मनोज बाजपेयी यांचा पहिला संसार, 'या' एका कारणामुळे पत्नी गेली सोडून

१९९८ साली प्रदर्शित झालेला सत्या हा सिनेमा सगळ्यांच्याच लक्षात असेल. या सिनेमात भिकू म्हात्रे  ही भूमिका साकारुन अभिनेता मनोज वाजपेयी याने इंडस्ट्रीत त्याचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. या सिनेमासोबतच त्याचे असंख्य सिनेमा सुपरहिट झाले. त्यामुळे इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून मनोज वाजपेयीकडे पाहिलं जातं. प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत येणाऱ्या मनोज वाजपेयी यांच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेक चढउतार आले. 

मनोज वाजपेयी यांनी शबाना रझा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. मात्र, शबाना रझा या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. यापूर्वी मनोज यांचं दिव्या नावाच्या मुलीशी लग्न झालं होतं. विशेष म्हणजे लव्ह मॅरेज करुनही त्यांचा संसार फक्त २ महिनेच टिकला. त्यानंतर ते कायदेशीररित्या विभक्त झाले.

का मोडला मनोज वाजपेयी यांचा पहिला संसार?

मनोज वाजपेयी ज्यावेळी 'अॅक्ट वन' ड्रमा ग्रुपमध्ये होते त्यावेळी त्यांची भेट दिव्या नावाच्या मुलीशी झाली होती. श्रीमंत कुटुंबातील दिव्या मनोज यांच्या प्रेमात पडली. विशेष म्हणजे या जोडीने पळून जाऊन एका मंदिरात लग्नगाठ बांधली. पोलिस संरक्षाखाली या दोघांनी लक्ष्मीनगरमधील मंदिरात लग्न केल्याचं सांगण्यात येतं.
दिव्याने मनोज यांच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर तिला काही दिवसातच या गोष्टीचा पश्चाताप होऊ लागला. श्रीमंत घरात वाढलेल्या दिव्याला मनोज यांच्या घरी आर्थिक चणचण जाणवू लागली. ज्यामुळे तिने मनोज यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
 

शबाना रझासोबत थाटला मनोज यांनी दुसरा संसार

घटस्फोटानंतर एका सिनेमाच्या सेटवर मनोज आणि शबाना यांची ओळख झाली. त्यानंतर जवळपास ८ वर्ष या जोडीने एकमेकांना डेट केलं. त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. 

Web Title : मनोज बाजपेयी की पहली शादी 2 महीने में टूटी: ये है वजह

Web Summary : मनोज बाजपेयी की दिव्या से पहली शादी आर्थिक तंगी के कारण सिर्फ दो महीने चली। बाद में उन्होंने शबाना रजा से आठ साल डेटिंग के बाद शादी की।

Web Title : Manoj Bajpayee's first marriage ended in 2 months: Here's why

Web Summary : Manoj Bajpayee's first marriage to Divya lasted only two months due to financial difficulties. He later married Shabana Raza after dating for eight years.