तारीख ठरली! भन्सालींचा 'लव्ह अँड वॉर' सिनेमा 'या' दिवशी प्रदर्शित होणार, रणबीर-विकी-आलियाला एकत्र पाहण्यास चाहते उत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 15:20 IST2026-04-17T15:19:22+5:302026-04-17T15:20:15+5:30
'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट रणबीर कपूर, आलिया भट आणि विकी कौशल यांना पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर आणत आहे. संजय लीला भन्साली दिग्दर्शित 'लव्ह अँड वॉर' सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.

तारीख ठरली! भन्सालींचा 'लव्ह अँड वॉर' सिनेमा 'या' दिवशी प्रदर्शित होणार, रणबीर-विकी-आलियाला एकत्र पाहण्यास चाहते उत्सुक
गेल्या अनेक दिवसांपासून सर्वाधिक प्रतिक्षित रोमँटिक सिनेमांपैकी एक मानला जाणारा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट रणबीर कपूर, आलिया भट आणि विकी कौशल यांना पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर आणत आहे. या तिघांची जोडी या दमदार सिनेमात दिसणार आहे. संजय लीला भन्साली दिग्दर्शित 'लव्ह अँड वॉर' सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. हा सिनेमा २७ जानेवारी २०२७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संघर्ष, भावना आणि नात्यांच्या गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात प्रेम, मैत्री, विश्वासघात आणि उत्कटता यांचा वेध घेतला जाणार असून, प्रेक्षकांना एक प्रभावी सिनेमॅटिक अनुभव देण्याचे सिनेमाच्या टीमने वचन दिले आहे. भव्य सेट्स आणि आशयघन सिनेमांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्याकडून या चित्रपटात भव्यता आणि भावनिकता यांचा उत्कृष्ट मिलाफ पाहायला मिळणार आहे. 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'लव्ह अँड वॉर'विषयी...
प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट 'लव्ह अँड वॉर' सध्या बॉलिवूडमध्ये प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल ही तगडी स्टारकास्ट पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट एक भव्य युद्धपट असून त्यामध्ये प्रेमाची एक हळवी बाजू देखील मांडण्यात येणार आहे. भन्साळींच्या इतर चित्रपटांप्रमाणेच यातही भव्य सेट, नेत्रदीपक सिनेमॅटोग्राफी आणि दमदार अभिनयाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.