Love In The Air किम शर्मा आणि लिएंडर पेस झाले रोमँटिक, Kiss करतानाचा फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 01:13 PM2021-12-24T13:13:34+5:302021-12-24T13:22:28+5:30

किम शर्मा (Kim Sharma) ने लिएंडर पेस(Leander Paes) सोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे,

Leander paes kiss kim sharma actress shares photo on instagram | Love In The Air किम शर्मा आणि लिएंडर पेस झाले रोमँटिक, Kiss करतानाचा फोटो केला शेअर

Love In The Air किम शर्मा आणि लिएंडर पेस झाले रोमँटिक, Kiss करतानाचा फोटो केला शेअर

googlenewsNext

अभिनेत्री किम शर्मा (kim Sharma) चित्रपटांपासून दूर असली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतेच इंस्टाग्रामवर किम शर्मा (kim Sharma)ने कुटुंबासोबत जेवण करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्याने लिएंडर पेस (leander Paes) सोबतचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये टेनिस स्टार अभिनेत्रीच्या गालावर किस करताना दिसत आहे. दोघेही एकत्र नाताळचा आनंद लुटत आहेत.


किम शर्मा  (kim Sharma) टेनिस स्टार लिएंडर पेस(leander Paes) ला डेट करत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून  येत आहेत. दोघेही मुंबईत एकत्र स्पॉट झाले होते. याशिवाय दोघेही एकत्र गोव्याच्या सुट्टीवर गेले होते. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगले आहे. अभिनेता हर्षवर्धन राणेसोबत किम शर्माच्या अफेअरची चर्चा होती. त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. तेव्हापासून किम सिंगल होती. मात्र, रिपोर्ट्सनुसार ती आता लिएंडर पेसला डेट करत आहे.


क्रिकेटपटू युवराज सिंग याच्यासोबतही तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा अशाच रंगल्या होत्या. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं होते. ब्रेकअपनंतर किम भारत सोडून विदेशात गेली आणि अचानक तिच्या लग्नाचीच बातमी आली. केनियाचा व्यापारी अली पणजनीशी तिनं संसार थाटला. पण हे लग्नही फार काळ टिकलं नाही. दोन वर्षांच्या आतच ते वेगळे झाले. त्यानंतर किमच्या आयुष्यात फॅशन डिझायनर आणि बिझनेसमन अर्जुन खन्ना आला होता. लिएंडरचं म्हणाल तर तो संजय दत्तची एक्स-वाईफ व मॉडेल रिया पिल्लईसोबत लिव्ह-इनमध्ये होता. दोघांना एक मुलगीही आहे.

Web Title: Leander paes kiss kim sharma actress shares photo on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.