Koffee With Karan : मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत रणबीर कपूरने व्यतित केली होती रात्र, अभिनेत्यानेच खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 11:49 AM2023-12-16T11:49:47+5:302023-12-16T11:50:31+5:30

Koffee With Karan Show : करण जोहरचा शो 'कॉफी विथ करण ८'चा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर, अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग करणच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहेत.

Koffee With Karan: Ranbir Kapoor spent the night with his friend's girlfriend, reveals the actor himself | Koffee With Karan : मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत रणबीर कपूरने व्यतित केली होती रात्र, अभिनेत्यानेच खुलासा

Koffee With Karan : मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत रणबीर कपूरने व्यतित केली होती रात्र, अभिनेत्यानेच खुलासा

बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर(Karan Johar)चा लोकप्रिय चॅट शो कॉफी विथ करण ८ (Koffee With Karan 8) सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच या शोमध्ये बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर(Arjun Kapoor)ने हजेरी लावली होती. या काळात अर्जुन कपूरने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. जेव्हा करणने अर्जुन आणि त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा (Malaika Arora) यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा अर्जुन कपूरने खूप विचारपूर्वक उत्तर दिले. अर्जुन कपूर म्हणाला की, योग्य वेळी मलायकासोबत याबद्दल बोलेन. दरम्यान, करण जोहरच्या शोचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर(Ranbir Kapoor), अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) करणच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहेत. या क्लिपमध्ये रणबीर कपूरने असे काही म्हटले आहे की अर्जुन कपूर अवाक् झाला होता.

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये रणबीर कपूर आला तेव्हा त्याने अनेक खुलासे केले. त्यावेळी रणबीर कपूरने अशी गोष्ट सांगितली होती की सगळेच थक्क झाले होते. या शोमध्ये करण जोहर अभिनेता रणबीर कपूर आणि रणवीर सिंगसोबत असा गेम खेळतो की, योग्य उत्तर दिल्यावर दोन्ही स्टार्सना अर्जुन कपूरच्या गालावर किस करावे लागेल. या गेमच्या सुरुवातीला करणने रणबीर कपूरला विचारले, 'त्याच्या कोणत्याही मित्राच्या मैत्रिणीसोबत त्याने रात्र व्यतित केली आहे का? त्यानंतर रणबीर त्याचा मित्र अर्जुनच्या गालाचे चुंबन घेतो आणि हो म्हणतो... यावर अर्जन म्हणतो, 'माझ्या गर्लफ्रेंडसोबत तर नाही ना? यावर रणबीरने लगेच उत्तर दिले, अजिबात नाही. रणबीर आणि अर्जुनचा हा व्हिडिओ इंटरनेटवर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

करण जोहरचा शो 'कॉफी विथ करण'ला वादग्रस्त म्हणून टॅग केले आहे. लोक म्हणतात की जो कोणी या शोमध्ये येतो तो कोणत्या ना कोणत्या वादात अडकतो. करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की लव्ह स्टोरी हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला असल्याची माहिती आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट दिसले होते. करणचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.
 

Web Title: Koffee With Karan: Ranbir Kapoor spent the night with his friend's girlfriend, reveals the actor himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.