PICS :  किम शर्मा व लिएंडर पेसनं खुल्लमखुल्ला दिली प्रेमाची कबुली..., साजरी केली First Anniversary...!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 06:15 PM2022-03-29T18:15:01+5:302022-03-29T18:15:25+5:30

Kim Sharma Leander Paes Romantic Pics : होय,किम व लिएंडरच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त दोघांनी झक्कास सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचे फोटो कपलनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kim Sharma Shares Romantic Pictures With Beau Leander Paes ON Their First Anniversary | PICS :  किम शर्मा व लिएंडर पेसनं खुल्लमखुल्ला दिली प्रेमाची कबुली..., साजरी केली First Anniversary...!

PICS :  किम शर्मा व लिएंडर पेसनं खुल्लमखुल्ला दिली प्रेमाची कबुली..., साजरी केली First Anniversary...!

googlenewsNext

Kim Sharma Leander Paes Romantic Pics : अभिनेत्री किम शर्माच्या (Kim Sharma) आयुष्यात वर्षभराआधी अभिनेता हर्षवर्धन राणे होता. पण आता तिच्या आयुष्यात लिएंडरची एन्ट्री झालीये. होय, किम माजी टेनिसपटू लिएंडर पेससोबत  (Leander Paes) रिलेशनशिपमध्ये आहे. आता हे रिलेशनशिप कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. दोघं अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसतात,एकमेकांसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करतात. सध्याही किम व लिएंडरचे अनेक रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो आहेत, कपलच्या फर्स्ट अ‍ॅनिव्हर्सरीचे. होय, दोघांच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त दोघांनी झक्कास सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचे फोटो कपलनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

एकमेकांना फर्स्ट अ‍ॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देत दोघांनीही रोमॅन्टिक फोटो पोस्ट केले आहेत. हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी चार्ल्स, 365 असं किमने लिहिलं आहे. तर हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी मिच... तू मला पहिल्याच नजरेत आवडली होतीस..., असं लिएंडरने लिहिलं आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात किम व लिएंडरचा पहिला एकत्र असा फोटो समोर आला होता. या फोटोत दोघंही गोव्यात एन्जॉय करताना दिसले होते. तेव्हापासून दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. यानंतर काही महिन्यांनी दोघांनीही आपलं रिलेशनशिप कन्फर्म केलं होतं.


   
किम शर्मा याआधी हर्षवर्धन राणेच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. क्रिकेटपटू युवराज सिंग याच्यासोबतही तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा अशाच रंगल्या होत्या. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं होते.  ब्रेकअपनंतर किम भारत सोडून विदेशात गेली आणि  अचानक तिच्या लग्नाचीच बातमी आली. केनियाचा व्यापारी अली पणजनीशी तिनं संसार थाटला. पण हे लग्नही फार काळ टिकलं नाही. दोन वर्षांच्या आतच ते वेगळे झाले. त्यानंतर किमच्या आयुष्यात फॅशन डिझायनर आणि बिझनेसमन अर्जुन खन्ना आला होता.
लिएंडरचं म्हणाल तर तो संजय दत्तची एक्स-वाईफ व मॉडेल रिया पिल्लईसोबत लिव्ह-इनमध्ये होता. दोघांना एक मुलगीही आहे.

Web Title: Kim Sharma Shares Romantic Pictures With Beau Leander Paes ON Their First Anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.