ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान किम शर्माने डिलीट केलं लिएंडर पेससोबतचे सर्व फोटो, २ वर्षांच्या नात्याला लागला पूर्णविराम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 15:53 IST2023-04-04T15:49:50+5:302023-04-04T15:53:31+5:30

किमने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून लिएंडरचे सर्व फोटो डिलीट करुन ब्रेकअपच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केले आहे.

Kim sharma deletes pictures with leander paes amid breakup reports | ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान किम शर्माने डिलीट केलं लिएंडर पेससोबतचे सर्व फोटो, २ वर्षांच्या नात्याला लागला पूर्णविराम?

ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान किम शर्माने डिलीट केलं लिएंडर पेससोबतचे सर्व फोटो, २ वर्षांच्या नात्याला लागला पूर्णविराम?

'मोहब्बतें' फेम किम शर्मा (Kim Sharma) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. रिपोर्टनुसार अभिनेत्री लिएंडर पेस(Leander Paes)पासून वेगळी होणार आहे.  किम आणि लिएंडरने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आता अलीकडेच किमने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून लिएंडरचे सर्व फोटो डिलीट करुन ब्रेकअपच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केला आहे.


किमने फोटो केले डिलीट 
किम शर्मा भारतीय टेनिस स्टार लिएंडर पेसला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे. दोघांनीही आपले नाते कधीच सीक्रेट ठेवले नाही. सोशल मीडियावरही हे कपल खुल्लम खुल्ला एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसले. पण आता मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. त्याचवेळी किमने आता तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लिएंडरच्या सर्व आठवणी पुसून टाकल्या आहेत. पण लिएंडरने किमचे फोटो डिलीट केलेले नाहीत आणि दोघेही इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत आहेत. 2021 मध्ये दोघांच्या नात्याला सुरुवात झाली. सोशल मीडियावर दोघे एकमेकांसोबतचे रोमाँटिक फोटो शेअर करायचे. 

त्याचवेळी लिएंडर पेसच्या आधी किम शर्माचे नाव अभिनेता हर्षवर्धन राणेसोबतही जोडले गेले होते. दोघांनीही बराच काळ एकमेकांना डेट केले आणि नंतर वेगळे झाले. दुसरीकडे, लिएंडर जवळपास 10 वर्षांपासून संजय दत्तची पत्नी आणि मॉडेल रिया पिल्लईसोबत लिव्हइनमध्ये होता. मात्र  रियाच्या म्हणण्यानुसार, तिने 2005 मध्ये पेसशी लग्न केले होते.
 

Web Title: Kim sharma deletes pictures with leander paes amid breakup reports