KGF Chapter 2 box office collection Day 1: ‘केजीएफ 2’चा धमाका! पहिल्याच दिवशी बजेटचा पैसा वसूल, केली इतक्या कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 13:10 IST2022-04-15T13:09:53+5:302022-04-15T13:10:22+5:30

KGF Chapter 2 box office collection Day 1 : कालच ‘केजीएफ 2’ चित्रपटगृहांत धडकला आणि पहिल्याच दिवशी या सिनेमानं अशी काही कमाल कमाल केली की पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बाहुबली 1, बाहुबली 2, वॉर,आरआरआर अशा अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले.

KGF Chapter 2 box office collection Yash's film record for day 1 opening | KGF Chapter 2 box office collection Day 1: ‘केजीएफ 2’चा धमाका! पहिल्याच दिवशी बजेटचा पैसा वसूल, केली इतक्या कोटींची कमाई

KGF Chapter 2 box office collection Day 1: ‘केजीएफ 2’चा धमाका! पहिल्याच दिवशी बजेटचा पैसा वसूल, केली इतक्या कोटींची कमाई

KGF Chapter 2 box office collection : अपेक्षा होती तसंच घडलं. सुपरस्टार यशचा (Yash) ‘केजीएफ 2’ने  (KGF Chapter 2) बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ‘केजीएफ 2’ची अगदी त्सुनामी आली आहे. पहिल्याच दिवशी ‘केजीएफ 2’ हिंदी सिनेमातील आत्तापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. कालच हा सिनेमा चित्रपटगृहांत धडकला आणि पहिल्याच दिवशी या सिनेमानं अशी काही कमाल कमाल केली की पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बाहुबली 1, बाहुबली 2, वॉर,आरआरआर अशा अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले. अगदी सलमान खान, शाहरूख खान यांची झळाळीही कमी केली.

बजेट वसूल
  
सुपरस्टार यशच्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग केली आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, चित्रपट पहिल्याच दिवशी चित्रपटाने 150 कोटींहून अधिक कमाई केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ‘केजीएफ 2’चा बजेट 150 कोटींचा आहे. हा बजेट पहिल्याच दिवशी वसूल झाला आहे.

हिंदी व्हर्जनने मोडला ‘वॉर’चा रेकॉर्ड
पहिल्याच दिवशी यशच्या चित्रपटाने जादू केली. एकीकडे ‘केजीएफ 2’ ने कन्नड भाषेत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. तर दुसरीकडे हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर 53.95 कोटींचा आकडा गाठला आहे.  याआधी फर्स्ट डे ओपनिंगचा हा रेकॉर्ड हृतिक रोशनच्या ‘वॉर’च्या नावावर होता. ‘वॉर’ने पहिल्या दिवशी 51.60 कोटींचा बिझनेस केला होता. ‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी फक्त 18 कोटी कमावले होते.

150 कोटी पार...

सर्व भाषा मिळून ‘केजीएफ 2’ने पहिल्या दिवशी नेट 128 कोटींचा  तर ग्रॉस 150 कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. एस. एस. राजमौलींच्या ‘आरआरआर’च्या पहिल्या दिवशीच्या कमाईपेक्षा अधिक आहे. या चित्रपटात यशसोबत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि रवीना टंडन  यांच्यासह साऊथ अभिनेत्री श्रीनिधी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: KGF Chapter 2 box office collection Yash's film record for day 1 opening