कतरिना कैफने आई म्हणून पहिल्यांदाच साजरा केला 'मदर्स डे'; लेक विहानसोबतचा सुंदर फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 09:56 IST2026-05-11T09:55:49+5:302026-05-11T09:56:16+5:30

कतरिना कैफने आई म्हणून काल पहिल्यांदाच 'मदर्स डे' साजरा केला.

Katrina Kaif First Mothers Day With Son Vihan Kaushal Viral Photos Vicky Kaushal Gift | कतरिना कैफने आई म्हणून पहिल्यांदाच साजरा केला 'मदर्स डे'; लेक विहानसोबतचा सुंदर फोटो केला शेअर

कतरिना कैफने आई म्हणून पहिल्यांदाच साजरा केला 'मदर्स डे'; लेक विहानसोबतचा सुंदर फोटो केला शेअर

काल रविवारी (१० मे) रोजी जगभरात 'मदर्स डे' म्हणजेच मातृदिन साजरा झाला. अनेक अभिनेत्रींनी काल आपल्या बाळांसोबत पहिला मातृदिन (Mother's Day) साजरा केला आहे. यामध्ये प्रामुख्याने बॉलिवूडची 'बार्बी डॉल' कतरिना कैफ हिचा समावेश होतो. कतरिना सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्प्याचा आनंद घेत आहे. गेल्या वर्षी आई झाल्यानंतर कतरिनाने अभिनयातून काहीसा ब्रेक घेतला असला, तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडून आहे. रविवारी जगभरात साजरा करण्यात आलेल्या 'मातृदिना'चे (Mother's Day) औचित्य साधत कतरिनाने तिचा ६ महिन्यांचा मुलगा विहान सोबतचे खास क्षण शेअर केले आहेत.

आई झाल्यानंतरचा कतरिनाचा हा पहिलाच मातृदिन होता. हा दिवस खास बनवण्यासाठी तिचा पती विकी कौशल आणि चिमुकल्या विहानने तिला एक सुंदर भेट दिली. कतरिनाने इंस्टाग्रामवर एका कार्डचा फोटो शेअर केला आहे, ज्यावर 'हॅपी मदर्स डे, माय लव्ह' असा संदेश लिहिला असून खाली विहान आणि विकी यांची नावे आहेत. 


आई-मुलाचा 'तो' फोटो सोशल मीडियावर व्हायरल

कतरिनाने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत आई आणि मुलाने हातात एक पुस्तक धरले असून, दोघांचे केवळ हात दिसत आहेत. या फोटोला तिने 'एका आनंदी आईचा दृष्टिकोन' (A Happy Mother's Perspective) असे सुंदर कॅप्शन दिले आहे. जरी कतरिनाने अद्याप विहानचा चेहरा जगासमोर आणलेला नसला, तरी या फोटोंवर श्वेता बच्चनसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

४२ व्या वर्षी कतरिना झाली आई

कतरिना कैफने वयाच्या ४२ व्या वर्षी, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी विहानला जन्म दिला. विकी आणि कतरिनाने आपल्या खाजगी आयुष्याला नेहमीच प्राधान्य दिले असून, ते सोशल मीडियावर बाळाचे फोटो क्वचितच शेअर करतात. मात्र, मातृदिनानिमित्त त्यांनी चाहत्यांना दिलेली ही झलक सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

Web Title : कैटरीना कैफ ने बेटे विहान संग पहला मदर्स डे मनाया।

Web Summary : कैटरीना कैफ ने पिछले साल माँ बनने के बाद अपना पहला मदर्स डे मनाया। उन्होंने अपने 6 महीने के बेटे विहान और पति विक्की कौशल के एक विशेष कार्ड के साथ तस्वीरें साझा कीं। माँ और बेटे की साझा तस्वीर वायरल हो गई है, जिसे प्रशंसकों और हस्तियों से प्यार मिल रहा है।

Web Title : Katrina Kaif celebrates first Mother's Day with son Vihan.

Web Summary : Katrina Kaif celebrated her first Mother's Day after becoming a mother last year. She shared moments with her 6-month-old son, Vihan, and a special card from her husband, Vicky Kaushal. The shared photo of mother and son has gone viral, receiving love from fans and celebrities.