वरुण अन् जान्हवीच्या चित्रपटांचा होणार क्लॅश; सोशल मीडियावर दोघांचाही मजेशीर संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:03 IST2026-05-06T12:02:21+5:302026-05-06T12:03:01+5:30

जान्हवीने शेअर केला व्हिडीओ, वरुण कमेंट करत म्हणाला...

janhvi kapoor and varun dhawan react to movies clash peddi vs hai jawani to ishq hona hai | वरुण अन् जान्हवीच्या चित्रपटांचा होणार क्लॅश; सोशल मीडियावर दोघांचाही मजेशीर संवाद

वरुण अन् जान्हवीच्या चित्रपटांचा होणार क्लॅश; सोशल मीडियावर दोघांचाही मजेशीर संवाद

येत्या जून महिन्यात बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या चित्रपटांची चुरस पाहायला मिळणार आहे. जान्हवी कपूर आणि राम चरण यांचा 'पेद्दी' हा चित्रपट ४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे, तर वरुण धवनचा 'है जवानी तो इश्क होना है' हा चित्रपट त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ५ जून रोजी चित्रपटगृहात दाखल होईल. या क्लॅशवर जान्हवी कपूर आणि वरुण धवनने  सोशल मीडियाच्या माध्यमातून मजेशीर संवाद साधला आहे.

जान्हवी कपूरने इंस्टाग्रामवर एक ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ शेअर करत 'आपल्यात क्लॅश होणार आहे' असं कॅप्शन दिलं आणि वरुणला टॅग केलं. यावर वरुणने सकारात्मक उत्तर देत लिहिले, 'तू शानदार आहेस आणि तुझ्याशी कधीच क्लॅश होऊ शकत नाही'. वरुणने जान्हवीचा व्हिडिओ आपल्या स्टोरीवर शेअर करत ती 'पेद्दी'मध्ये अप्रतिम दिसत असल्याचे सांगून तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.


वरुण धवनच्या 'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये अनेकदा बदल करण्यात आले होते. यशचा 'टॉक्सिक' चित्रपट ४ जूनला येणार होता तेव्हा सिनेमाची तारीख आधी १२ जून करण्यात आली होती. मात्र नंतर 'टॉक्सिक'ची रिलीज डेट पुन्हा बदलली त्यामुळे वरुणचा सिनेमा प्रीपोन करण्यात आला होता. मात्र आता अखेर हा चित्रपट ५ जून रोजीच प्रदर्शित होईल. डेव्हिड धवन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात वरुणसोबत मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत असून राकेश बेदी, चंकी पांडे आणि मनीष पॉल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

दुसरीकडे, जान्हवी कपूर आणि राम चरण स्टारर 'पेद्दी' हा चित्रपट बुची बाबू सना यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात शिवा राजकुमार, दिव्येंदू शर्मा आणि जगपती बाबू यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांमध्ये या दोन्ही चित्रपटांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title : वरुण और जान्हवी की फिल्मों का होगा क्लैश; सोशल मीडिया पर मजेदार बातचीत

Web Summary : जून में वरुण धवन और जान्हवी कपूर की फिल्मों का क्लैश होगा। जान्हवी की 'पेद्दी' और वरुण की 'है जवानी तो इश्क होना है' लगातार दिनों में रिलीज होंगी, जिससे सोशल मीडिया पर मजेदार बातचीत हुई। दोनों सितारों ने एक दूसरे को शुभकामनाएं दीं।

Web Title : Varun and Janhvi's films to clash; humorous exchange on social media.

Web Summary : Varun Dhawan and Janhvi Kapoor's films will clash in June. Janhvi's 'Peddhi' and Varun's 'Hai Jawani Toh Ishq Hona Hai' release on consecutive days, leading to a playful social media interaction. Both stars wished each other well.