​इरफान खानचा रोमांटिक अंदाज : ‘हिंदी मीडियम’चा फर्स्ट लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 21:32 IST2017-01-06T21:32:28+5:302017-01-06T21:32:28+5:30

बॉलिवूडमध्ये आपल्या गंभीर अभिनयासाठी ओळख मिळविणारा अभिनेता इरफान खानचा आगामी चित्रपट ‘हिंदी मीडियम’ची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या ...

Irrfan Khan's Romantic Style: First Look of 'Hindi Medium' | ​इरफान खानचा रोमांटिक अंदाज : ‘हिंदी मीडियम’चा फर्स्ट लूक

​इरफान खानचा रोमांटिक अंदाज : ‘हिंदी मीडियम’चा फर्स्ट लूक

ong>बॉलिवूडमध्ये आपल्या गंभीर अभिनयासाठी ओळख मिळविणारा अभिनेता इरफान खानचा आगामी चित्रपट ‘हिंदी मीडियम’ची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक स्वत: इरफान खानने शेअर केला आहे. हा फर्स्ट लुक पाहिल्यावर या चित्रपटात त्याची भूमिका रोमाँटिक हिरोची असेल असे दिसतेय. 

इरफान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हिंदी मीडियमचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. या चित्रपटात त्याच्यासह पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर मुख्य भूमिकेत आहे. इरफानने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो रिक्शा चालविताना दिसतो आहे. तर सबा मागे बसली असून ती लाजताना दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साकेत चौधरी याने केले आहे. यापूर्वी साकेतने विद्या बालन व फरहान अख्तर यांच्या भूमिका असलेल्या ‘शादी के साईड इफेक्ट्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. इरफान खान व सबा कमर यांचा हा चित्रपट ३१ मार्च २०१७ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. 

या चित्रपटात दिल्लीच्या चांदनी चौक येथे राहणाºया एका मीडल क्लास कुटुंबाची कथा दाखविली जाणार आहे. हे कुटुंबीय दिल्लीतील हाय क्लास सोसायटीमध्ये अ‍ॅडजेस्ट होण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे त्यांच्या जीवनात होणारी धावपळ ही या चित्रपटाची मुख्य कथा आहे. या चित्रपटाची शूटिंग चांदनी चौकातच करण्यात आली आहे.

सबा कमरने या पूर्वी मंटो आणि लाहोत से आगे या चित्रपटात काम केले आहे. या शिवाय ती पाकिस्तानी टीव्हीवर प्रसारित केल्या जाणाºया एका मालिकेत फवाद खानसोबत दिसली आहे. दुसरीकडे इरफानचा हा यावर्षातील पहिला चित्रपट असून मागील वर्षी त्याने टॉम हॅक्स सोबत इन्फर्नो या हॉलिवूड चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 

#HindiMedium@maddockfilms@TSeriespic.twitter.com/B0Yz9VZU3v— Irrfan (@irrfank) January 5, 2017 ">http://

}}}}

Web Title: Irrfan Khan's Romantic Style: First Look of 'Hindi Medium'