​‘खुदा भी नहीं जानता सलमान कब शादी करेगा ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 16:35 IST2016-08-13T11:04:41+5:302016-08-13T16:35:37+5:30

होय, हे अगदी खरं आहे. सुपरस्टार सलमान खान केव्हा लग्न करेल, हे साक्षात परमेश्वराही ठाऊक नाही. हे आम्ही नाही ...

'I do not even know when Salman will marry' | ​‘खुदा भी नहीं जानता सलमान कब शादी करेगा ’

​‘खुदा भी नहीं जानता सलमान कब शादी करेगा ’

य, हे अगदी खरं आहे. सुपरस्टार सलमान खान केव्हा लग्न करेल, हे साक्षात परमेश्वराही ठाऊक नाही. हे आम्ही नाही तर सलमानचे पिता सलीम खान यांचे म्हणणे आहे. सुप्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान एक रेडिओ शो होस्ट करताना दिसणार आहेत. खुद्द सलीम यांनीच टिष्ट्वटरवर ही माहिती दिली. मी एक रेडिओ शो होस्ट करणार आहे. पण कृपया शोदरम्यान मला सलमानच्या लग्नाबाबत कुठलाच प्रश्न विचारू नका. सलमान कधी लग्न करणार, हा प्रश्न सोडून तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारू शकता. कारण सलमान कधी लग्न करणार हे खुद्द परमेश्वरालाही ठाऊक नाही, असे टिष्ट्वट सलीम खान यांनी केले आहे. आता सलमानच्या लग्नाची बातमी ऐकण्यास आपण सगळे आतूर आहोतच. पण सलीम यांची विनंतीही तुम्हा आम्हाला मान्य करायलाच हवी ना !

Web Title: 'I do not even know when Salman will marry'