पती रितेश करतोय पत्नी जेनेलियाची सेवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 09:57 IST2016-05-03T04:25:59+5:302016-05-03T09:57:24+5:30

 वेल...तुम्ही जे वाचताय ते अगदी खरंय बरं का! जेनेलिया डिसूझा देशमुख सध्या दुसºयांदा गरोदर असून पती रितेशक डून ती ...

Husband Ritesh's service to wife Genelia? | पती रितेश करतोय पत्नी जेनेलियाची सेवा?

पती रितेश करतोय पत्नी जेनेलियाची सेवा?

 
ेल...तुम्ही जे वाचताय ते अगदी खरंय बरं का! जेनेलिया डिसूझा देशमुख सध्या दुसºयांदा गरोदर असून पती रितेशक डून ती चांगलेच लाड आणि सेवा करून घेताना दिसते आहे.

नुकतेच करणसिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासु यांच्या लग्नाच्या रिसेप्शनवेळी काय झाले? जेनेलियाला जेवणे अवघड जाऊ लागले म्हणून पती रितेशने पुढे होऊन तिला जेवू घालण्यास सुरूवात केली. मग काय? जेनेलियाची तर मज्जाच झाली.

चक्क पतीच जेवू घालतो म्हटल्यावर काय...तिची तर मजाच आहे ना! जेनेलिया-रितेश यांना अगोदरच एक मुलगा रिआन आहे. रितेश सध्या हाऊसफुल्ल ३ या कॉमेडी चित्रपटासाठी शूटिंग करत असून त्यातील गाणे यूट्यूबवर हीट होत आहेत.

तसेच मराठीत ‘बँजो’ चित्रपटाची शूटिंगही तो करतो आहे.

 

Web Title: Husband Ritesh's service to wife Genelia?