Happy wedding anniversary : ​काजोलची हबी अजय देवगणसोबतची ही क्यूट सेल्फी तुम्ही पाहिलीतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 14:17 IST2017-02-24T08:47:13+5:302017-02-24T14:17:13+5:30

आज (२४ फेबु्रवारी) दोघांच्या लग्नाला १८ वर्षे पूर्ण झाली. आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काजोलने हबी अजय देवगणसोबतची एक क्यूट सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Happy wedding anniversary: ​​Have you seen this cute selfie with Ajay Devgan, Kajol's hobby? | Happy wedding anniversary : ​काजोलची हबी अजय देवगणसोबतची ही क्यूट सेल्फी तुम्ही पाहिलीतं?

Happy wedding anniversary : ​काजोलची हबी अजय देवगणसोबतची ही क्यूट सेल्फी तुम्ही पाहिलीतं?

जोल व अजय देवगण यांची जोडी बी-टाऊनमधील लोकप्रीय जोड्यांपैकी एक आहे. आज (२४ फेबु्रवारी) दोघांच्या लग्नाला १८ वर्षे पूर्ण झाली. आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काजोलने हबी अजय देवगणसोबतची एक क्यूट सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही सेल्फी काजोल व अजयच्या प्रेमाची साक्ष देणारी आहे. या सेल्फीनंतर काजोल व अजय या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाºया मॅसेजचा जणू पाऊस पडला.



९० च्या दशकात काजोल करिअरच्या शिखरावर असताना अचानक तिने अजयशी लग्नाचा निर्णय घेतला आणि २४ फेबु्रवारी १९९९ मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले.‘हलचल’ या चित्रपटाच्या सेटवर अजय व काजोलची पहिली भेट झाली होती. यानंतर दोघेही एकमेकांचे मित्र बनले. अजय काहीसा बुजरा आहे. त्याला गर्दीपेक्षा एकांतात बसणे, जास्त आवडते, असे काजोलला पहिल्याच भेटीत जाणवले. पण मैत्री झाल्यावर दोघेही गप्पा मारू लागले. या चित्रपटानंतर ही जोडी अनेक चित्रपटात एकत्र दिसली. ‘इश्क’,‘प्यार तो होना ही था’,‘दिल क्या करे’, ‘राजू चाचा’,‘यू मी और हम’ अशा अनेक चित्रपटांत अजय-काजोलची जोडी दिसली. यादरम्यान  मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले, हे दोघांनाही कळले नाही. यानंतर अचानक दोघांनीही सगळ्यांना धक्का देत लग्नाचा निर्णय घेतला.



महाराष्ट्रीय पद्धतीने अतिशय मोजक्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा झाला. लग्नानंतर गेली १८ वर्षे अजय व काजोल एकत्र आहेत. दोघांनाही न्यासा आणि युग अशी दोन मुले आहेत.



अजय सध्या ‘बादशाहो’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे तर काजोल एका साऊथच्या चित्रपटात. लग्नानंतर काजोलने चित्रपटात काम करणे बरेच कमी केले. पण चाहत्यांचे तिच्यावरील प्रेम जराही कमी झालेले नाही.

Web Title: Happy wedding anniversary: ​​Have you seen this cute selfie with Ajay Devgan, Kajol's hobby?