First Poster : अजय देवगणने सुचविलेल्या ‘मिर्झा ज्युलियट’ नावाच्या सिनेमाची पहा पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 19:03 IST2017-03-05T13:33:04+5:302017-03-05T19:03:04+5:30

एका अनोख्या प्रेमकथेवर आधारित असलेल्या ‘मिर्झा ज्युलियट’ या सिनेमाचे नुकतेच पहिले पोस्टर आउट करण्यात आले असून, सिनेमाचे नाव अभिनेता ...

First Poster: The first glimpse of a movie titled 'Mirza Jollyat', suggested by Ajay Devgan | First Poster : अजय देवगणने सुचविलेल्या ‘मिर्झा ज्युलियट’ नावाच्या सिनेमाची पहा पहिली झलक

First Poster : अजय देवगणने सुचविलेल्या ‘मिर्झा ज्युलियट’ नावाच्या सिनेमाची पहा पहिली झलक

ा अनोख्या प्रेमकथेवर आधारित असलेल्या ‘मिर्झा ज्युलियट’ या सिनेमाचे नुकतेच पहिले पोस्टर आउट करण्यात आले असून, सिनेमाचे नाव अभिनेता अजय देवगण याने सुचविले असल्याचा खुलासा सिनेमाच्या दिग्दर्शकाने केला आहे. राजेश राम सिंह यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात दर्शनकुमार आणि पिया बाजपेयी यांची प्रमुख भूमिका आहे. 

दरम्यान, रिलिज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये दर्शनकुमार, पिया बाजपेयी यांची झलक दिसत असून, त्यांच्या व्यतिरिक्त सिनेमात प्रियांशू चॅटर्जी आणि चंदन रॉय सन्याल यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सिनेमा ट्रेंड अ‍ॅनॅलिस्ट तरन आदर्श यांच्या हस्ते हे पोस्टर रिलिज करण्यात आले आहे. यावेळी दिग्दर्शक राजेश राम सिंह यांनी सांगितले की, हे खरं आहे की, सिनेमाचे नाव अजय देवगण यानेच सुचविले आहे. 

First look poster of #MirzaJuuliet. Stars Darshan Kumaar, Pia Bajpai, Priyanshu Chatterjee and Chandan Roy Sanyal. Rajesh Ram Singh directs. pic.twitter.com/g0mq4x4LlN— taran adarsh (@taran_adarsh) March 4, 2017 ">http://

}}}}
उत्तर प्रदेशातील भूमिवर चित्रित करण्यात आलेल्या या सिनेमात रोमान्स, अ‍ॅक्शन आणि रोमांचक बघावयास मिळणार आहे. ही एक प्रेमकथा असून, त्यामधून निर्माण होणारे प्रसंग प्रेक्षकांना रोमांचित करणार आहे. सिनेमाचे बहुतेक शूटिंग मिर्झापूर, बनारस आणि धर्मशाळा येथे करण्यात आले आहे. सिनेमातील नायकाचे नाव मिर्झा आणि नायिकेचे नाव ज्युलियट असे आहे. 

सिनेमाच्या नावावरूनच हा सिनेमा प्रेमकथेवर आधारित असल्याचे स्पष्ट होत असले तरी त्यामध्ये सर्व मसाला असल्याने प्रेक्षकांना हा सिनेमा भावेल अशी अपेक्षा यावेळी निर्मात्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. पोस्टर रिलिज करण्यात आल्याने आता प्रेक्षकांना सिनेमाच्या ट्रेलरची प्रतीक्षा आहे. मात्र निर्मात्यांकडून ट्रेलरबाबतचा कुठलाही खुलासा याप्रसंगी केला गेला नाही. 

Web Title: First Poster: The first glimpse of a movie titled 'Mirza Jollyat', suggested by Ajay Devgan