​अखेर कंगना राणौतला शाहिद कपूरने दिले खरमरीत उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 15:33 IST2017-02-19T10:03:35+5:302017-02-19T15:33:35+5:30

शाहिद कपूर आणि कंगना राणौत या दोघांचा ‘रंगून’ सिनेमा सध्या भलताच चर्चेत आहे. विशेष म्हणजे, चित्रपटापेक्षा शाहिद आणि कंगना ...

Finally, Shahid Kapoor gave Kangna Ranaut a reply. | ​अखेर कंगना राणौतला शाहिद कपूरने दिले खरमरीत उत्तर!!

​अखेर कंगना राणौतला शाहिद कपूरने दिले खरमरीत उत्तर!!

हिद कपूर आणि कंगना राणौत या दोघांचा ‘रंगून’ सिनेमा सध्या भलताच चर्चेत आहे. विशेष म्हणजे, चित्रपटापेक्षा शाहिद आणि कंगना या दोघांत काहीतरी बिनसल्याचीच चर्चा अधिक आहे. ‘रंगून’च्या सेटवर कंगना व शाहिद या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. इतके की, दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना कसेबसे सांभाळून घ्यावे लागले. या भांडणानंतर शाहिद व कंगना दोघेही एकत्र प्रमोशन करणार नाहीत, असेही कानावर आले. अर्थात त्यातून मार्ग निघाला अन् दोघेही एकत्र प्रमोशन करताना दिसले. पण प्रमोशनदरम्यान त्यांच्यातील मतभेद मात्र लपता लपले नाहीत.

अलीकडे एका मुलाखतीत कंगनासोबतच्या वादावर शाहिद बोललाच. आधी कंगनासोबतच्या वादावर बोलण्याचे शाहिदने टाळले. पण शेवटी त्याचा तोल गेलाच आणि जे काय बोलायचे ते तो बोलून गेला. मी गेल्या काही दिवसांपासून माझ्या व कंगनाबद्दलच्या निगेटीव्ह बातम्या वाचतो आहे. आधी या बातम्या वाचून मला आश्चर्य वाटते. पण आता मला हे सांगावेसे वाटते की, समोरच्या व्यक्तिसारखी(कंगना) मीडियाच्या माध्यमातून कुणाबद्दल वाईट बोलण्याची माझी खोड नाही. चुकीचे स्टेटमेंट देणे वा कुणाबद्दल चुकीचे बोलणे, माझ्या स्वभावात बसत नाही. त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणात मला टेबल-टेनिसची मॅच खेळायची नाही. एकदा ती बोलेल, मग मी बोलेल आणि पुन्हा टक़..टक़..टक़.. असा हा खेळ मला चालू द्यायचा नाही.  मला यासंदर्भात काहीही बोलायचे नाही. कंगना आपल्या सगळ्या सहकलाकारांसोबत मिळून मिसळून वागेल आणि पुढे जाईल, अशीच आशा मी करतो, असे शाहिद म्हणाला.

ALSO READ :​शाहिद कपूर म्हणतो, कंगना राणौत सोबत माझे मतभेद नाहीत!

भविष्यात कंगनासोबत काम करणार का, या प्रश्नावरही शाहिद भलताच चिडला. मी कुठलाही गेम प्लान तयार करत नाही. समोर जे येईल, ते ते मी स्वीकारणार, असे तो म्हणाला.

Web Title: Finally, Shahid Kapoor gave Kangna Ranaut a reply.