‘मदारी’ चा लक्षवेधी ट्रेलर आऊट....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 10:23 IST2016-05-12T04:53:08+5:302016-05-12T10:23:08+5:30

दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे चित्रपट उत्तम कथानक, परिपक्व अभिनय, श्रवणीय संगीत, लक्षवेधक मांडणी यासाठी वैशिष्टयपूर्ण असतात. त्यांचा नुकताच रिलीज झालेला ‘मदारी’ चा ट्रेलरही असेच काही सांगतोय.

Eye-catching trailer out of 'Madari' .... | ‘मदारी’ चा लक्षवेधी ट्रेलर आऊट....

‘मदारी’ चा लक्षवेधी ट्रेलर आऊट....

 
िग्दर्शक निशिकांत कामत यांचे चित्रपट उत्तम कथानक, परिपक्व अभिनय, श्रवणीय संगीत, लक्षवेधक मांडणी यासाठी वैशिष्टयपूर्ण असतात. त्यांचा नुकताच रिलीज झालेला ‘मदारी’ चा ट्रेलरही असेच काही सांगतोय.

चित्रपटाचा अभिनेता इरफान खान आणि जिमी शेरगील हे ट्रेलरच्या लाँचिंगवेळी उपस्थित होते. ट्रेलर अतिशय हृदयस्पर्शी असून इरफानने यात एका सामान्य नागरिकाची भूमिका केली आहे. समाजातील जाणकार नागरिक असतो. काही राजकीय नेते त्याच्या मुलाला घेऊन जातात.

त्यामुळे इरफान मग मुख्यमंत्र्याच्या आठ वर्षांच्या मुलालाच किडनॅप करतो. जिमी शेरगीलने यात पोलीस अधिकाºयाची भूमिका केली असून त्याला मुख्यमंत्र्याकडून इरफान आणि लहान मुलाला शोधण्याची जबाबदारी दिलेली असते. पॉलिटिकल थ्रिलर असा हा चित्रपट वाटतो आहे. चित्रपट १० जूनला रिलीज होणार आहे.

">http://

creative image banner



 

Web Title: Eye-catching trailer out of 'Madari' ....