Video: आधी स्वतःवर पाणी ओतलं आणि मग...; 'धुरंधर' गायिकेवर संतापले चाहते, कॉन्सर्टमध्ये काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 12:40 IST2026-04-22T12:36:58+5:302026-04-22T12:40:39+5:30
अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिच्या एका लाईव्ह कॉन्सर्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गायिकेच्या विचित्र वागण्याची चर्चा आहे

Video: आधी स्वतःवर पाणी ओतलं आणि मग...; 'धुरंधर' गायिकेवर संतापले चाहते, कॉन्सर्टमध्ये काय घडलं?
प्रसिद्ध पंजाबी गायिका आणि 'धुरंधर' चित्रपटातील गाण्यांमुळे चर्चेत असलेली जस्मिन सँडलास (Jasmine Sandlas) सध्या एका वादात सापडली आहे. अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिच्या एका लाईव्ह कॉन्सर्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिने लाईव्ह परफॉर्म करताना विचित्र कृती केल्याने प्रेक्षक तिच्यावर चांगलेच चिडले आहेत
काय आहे प्रकरण?
अहमदाबादमध्ये जस्मिनचा एक मोठा म्युझिक कॉन्सर्ट पार पडला. या शोसाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती, मात्र जस्मिनने मात्र तिच्या चाहत्यांची निराशा केली. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओनुसार, जस्मिन स्टेजवर गाणे गाण्याऐवजी केवळ 'लिप सिंक' (आधीच रेकॉर्ड केलेल्या गाण्यावर फक्त ओठ हलवणे) करत होती. लाईव्ह परफॉर्मन्सच्या नावाखाली प्रेक्षकांची फसवणूक झाल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
स्वतःवर पाणी ओतल्याने चर्चा
केवळ लिप सिंकच नाही, तर जस्मिनच्या एका कृतीने सर्वांनाच चकित केले. गाणे सुरू असताना तिने पाण्याची बाटली घेतली आणि स्वतःच्या डोक्यावर पाणी ओतून घेतले. तिचे हे अजब वागणे आणि स्टेजवरील विचित्र वावर पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही नेटकऱ्यांनी तर तिची तुलना हॉलिवूड कलाकारांची 'स्वस्त कॉपी' अशी केली आहे.
चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिले, "आम्ही तुझे गाणे ऐकायला आलो होतो, तुझे नाटक पाहायला नाही." दुसऱ्या एकाने संताप व्यक्त करत म्हटले, "पैसे देऊन लिप सिंक पाहायला लावणे चुकीचे आहे." तर काहींनी तिच्या या वागण्याला 'पब्लिसिटी स्टंट' म्हटले आहे. जस्मिन सँडलासने अलीकडेच 'धुरंधर' सारख्या मोठ्या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. मात्र लाईव्ह कॉन्सर्टमध्ये जस्मिनचं असं वागणं नेटकऱ्यांना आवडलेलं नाहीये.