​‘दंगल’चे शूटींग लांबले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 18:12 IST2016-05-17T12:42:58+5:302016-05-17T18:12:58+5:30

मिस्टर पररफेक्शनिस्ट आमीर खान याला ‘दंगल’साठी चांगलाच घाम गाळावा लागतोय. गतवर्षी सप्टेंबरमध्ये आमीरने या बायोपिकचे शूटींग सुरु केले होते. ...

'Dangle' shot down! | ​‘दंगल’चे शूटींग लांबले!

​‘दंगल’चे शूटींग लांबले!

स्टर पररफेक्शनिस्ट आमीर खान याला ‘दंगल’साठी चांगलाच घाम गाळावा लागतोय. गतवर्षी सप्टेंबरमध्ये आमीरने या बायोपिकचे शूटींग सुरु केले होते. शिवाय यासाठी बरेच वजनही वाढवले होते. वाढलेल्या वजनासह आवश्यक ती दृश्ये शूट केल्यानंतर आमीरला याच चित्रपटासाठी पुन्हा वाढलेले वजन कमी करावे लागतेय. त्यानुसार आमीरने ठरलेल्या कालावधी वजन कमी केले आणि पुढच्या शूटींगला सुरुवातही केली. या महिन्याच्या अखेरपर्यंत ही शूटींग संपणे अपेक्षित होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शूटींग शेड्यूल लांबणीवर पडलेयं. अद्यापही चित्रपटातील काही महत्त्वपूर्ण दृश्ये व एका अख्ख्या गाण्याचे चित्रीकरण होणे बाकी आहे. त्यामुळे ‘दंगल’चे शूटींग जुलैत संपेल असे दिसतेय. अर्थात याचा ‘दंगल’च्या डिसेंबरमधील रिलीज डेटवर कुठलाही फरक पडणार नाही. ठरल्यानुसार,नाताळच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.अद्याप चित्रपटाची अधिकृत रिलीज डेट जारी करण्यात आली नाही. पण वचनाचा पक्का आमीर असल्यानंतर चिंताच नाही...पण डिसेंबरपर्यंत धीर मात्र धरावाच लागणार आहे..काय कळलं ना??

Web Title: 'Dangle' shot down!