Cannes 2024 : बापरे! कियारा अडवाणीनं घातला कोट्यवधींचा नेकलेस; किंमत ऐकून व्हाल शॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 07:07 PM2024-05-21T19:07:49+5:302024-05-21T19:08:51+5:30

बॉलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी.

Cannes 2024: Kiara's diamond necklace is priced at Rs. 30 crore | Cannes 2024 : बापरे! कियारा अडवाणीनं घातला कोट्यवधींचा नेकलेस; किंमत ऐकून व्हाल शॉक

Cannes 2024 : बापरे! कियारा अडवाणीनं घातला कोट्यवधींचा नेकलेस; किंमत ऐकून व्हाल शॉक

Kiara Advani At Cannes 2024 : बॉलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी.कियारा अडवाणी हे नाव हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर येतं. दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. अलिकडेच तिनं कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 च्या रेड कार्पेटवर आपल्या लूकने सर्वांना वेड लावले. यावेळी कियाराने परिधान केलेल्या ड्रेसपेक्षा तिच्या नेकलेसचीच जास्त चर्चा रंगली. कियाराचा हा नेकलेस दिसायला छोटा असला तरीही त्याची किंमत ऐकून तुम्ही थक्कच व्हाल.

कियारा अडवाणी फ्रेंच रिव्हिएरामध्ये तिचा जलवा दाखवला. गाला डिनरसाठी कियाराने ऑफ-शोल्डर गुलाबी-काळ्या फिश टेल गाऊनमध्ये डिस्ने प्रिन्सेसचा लूक केला होता. तिचा हा राजकुमारीचा लूक पाहून चाहते घायाळ झाले. कियाराने तिचा डिस्ने प्रिन्सेस लुक डायमंड नेकलेसने पूर्ण केला. कियाराच्या या नेकलेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सर्वांच्या नजरा कियाराच्या नेकलेसवर खिळल्या.  

एका रिपोर्टनुसार कियाराने या सोहळ्यासाठी परिधान केलेला हा नेकलेस बुल्गारी (Bulgari) ब्रॅण्डचा आहे. या नेकलेसची किंमत तब्बल 30 कोटी रुपये आहे. हा 'सप्रेंटी हाय ज्वेलरी नेकलेस' म्हणून ओळखला जातो.  त्यामुळे छोटा दिसणारा हा नेकलेस किंमतीने किती मोठा आहे, याची कल्पना आपण करु शकतो.प्रियंका चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अभिनेता रणवीर सिंगसह 'डॉन ३' मध्ये झळकणार आहे. कियारा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. त्या माध्यमातून अभिनेत्री आपल्या वैयक्तिक तसेच खासगी आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Web Title: Cannes 2024: Kiara's diamond necklace is priced at Rs. 30 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.