सनी देओलसोबत 'हा' अभिनेता देशासाठी लढणार! २७ वर्षांनी 'बॉर्डर २'ची शानदार घोषणा, रिलीज डेटही जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 14:59 IST2024-08-23T14:58:40+5:302024-08-23T14:59:57+5:30

Border 2 : 'बॉर्डर २'ची घोषणा करण्यात आली आहे. त्याबरोबरच सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 

border 2 movie sunny deol film to be released in jan 2026 varun dhawan to play important role | सनी देओलसोबत 'हा' अभिनेता देशासाठी लढणार! २७ वर्षांनी 'बॉर्डर २'ची शानदार घोषणा, रिलीज डेटही जाहीर

सनी देओलसोबत 'हा' अभिनेता देशासाठी लढणार! २७ वर्षांनी 'बॉर्डर २'ची शानदार घोषणा, रिलीज डेटही जाहीर

देशप्रेमाची भावना जागवणारा ९०च्या दशकातील अजरामर चित्रपट म्हणजे 'बॉर्डर'. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा प्रचंड गाजला. आता तब्बल २७ वर्षांनी या सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच 'बॉर्डर २'ची घोषणा करण्यात आली आहे. त्याबरोबरच सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 

'बॉर्डर' च्या सीक्वलबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. या सिनेमात वरुण धवन असल्याची चर्चाही रंगली होती. आता वरुण धवनने त्याच्या अकाऊंटवरुन या सिनेमाची छोटीशी झलक दाखवणारा व्हिडिओ शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे. या व्हिडिओमध्ये वरुण धवन "दुश्मन की हर गोली से जय हिंद बोलकर टकराता हूँ...जब धरती माँ बुलाती है सब छोडकर आता हूँ...हिंदुस्थान का फौजी हूँ मै", असं बोलत आहे. 

'बॉर्डर २'  सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता असली तरी या चित्रपटासाठी त्यांना वाट लागणार आहे. २०२६ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रजासत्ताक दिनाचं प्रेक्षकांना खास गिफ्ट मिळणार आहे. २३ जानेवारी २०२६ रोजी हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. 


हा व्हिडिओ शेअर करत त्याने पोस्टही लिहिली आहे. "मी चौथीत होतो तेव्हा चंदन सिनेमागृहात जाऊन बॉर्डर सिनेमा पाहिला होता. त्याचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला होता. अजूनही आठवतंय मला तो सिनेमा हॉल देशप्रेमाने गजबजून गेला होता. नैसर्गिक आपत्तींमध्येही बॉर्डरवर उभं राहून आपलं रक्षण करणाऱ्या जवानांना माझा सलाम! बॉर्डर २ मध्ये काम करणं हे माझ्या करिअरमधील खास क्षण आहे. सनी पाजीबरोबर काम करायला मिळाल्याने हे अजून खास बनलं आहे", असं धवनने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

Web Title: border 2 movie sunny deol film to be released in jan 2026 varun dhawan to play important role