बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांना मातृशोक; ९४ वर्षांच्या आईचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 10:51 IST2026-03-20T10:50:31+5:302026-03-20T10:51:27+5:30

Manish Malhotra Mother Death: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनिष मल्होत्रा यांच्या आई गरिमा मल्होत्रा यांचं निधन झालं आहे.

Bollywood's famous fashion designer Manish Malhotra 94 year old mother garima malhotra passed away | बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांना मातृशोक; ९४ वर्षांच्या आईचं निधन

बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांना मातृशोक; ९४ वर्षांच्या आईचं निधन

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनिष मल्होत्रा यांच्या आई गरिमा मल्होत्रा यांचं निधन झालं आहे. त्या ९४ वर्षांच्या होत्या. गुरुवारी(१९ मार्च) त्यांची प्राणज्योत मालवली. मनिष मल्होत्रा यांचं त्यांच्या आईसोबत खूप खास नात होतं. आईच्या जाण्याने त्यांचं कुटुंबीय दु:खात आहे. 

मनिष मल्होत्रा यांच्या टीमकडून त्यांच्या आईच्या निधनाबाबत माहिती देण्यात आली आहे. "कृतज्ञतापूर्वक एक सुंदर आयुष्य जगल्यानंतर आईचं ९४ व्या वर्षी निधन झालं आहे. खूप साऱ्या चांगल्या आठवणी, भरपूर प्रेम ती मागे सोडून गेली आहे. तिचा हा वारसा आम्हाला पुढेही मार्ग दाखवत राहील", असं पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे. शुक्रवारी (२० मार्च) सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 


मनिष मल्होत्रा यांच्या आईच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या घरी धाव घेतली. वरुण धवन त्याच्या पत्नीसोबत मनिष मल्होत्रा यांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचला होता. त्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, मलायका अरोरा, संजय कपूर, करिश्मा कपूर हे सेलिब्रिटीही मनिष मल्होत्रा यांचं सांत्वन करण्यासाठी गेले होते. 

Web Title : मशहूर फैशन डिजाइनर मनीष मल्होत्रा की मां का 94 वर्ष की उम्र में निधन

Web Summary : मनीष मल्होत्रा की मां, गरिमा मल्होत्रा, का 94 वर्ष की उम्र में निधन हो गया। सांताक्रूज में उनका अंतिम संस्कार किया जाएगा। बॉलीवुड हस्तियों ने शोक व्यक्त किया। परिवार शोक में है।

Web Title : Fashion Designer Manish Malhotra's Mother Passes Away at 94

Web Summary : Manish Malhotra's mother, Garima Malhotra, passed away at 94. Her funeral will be held in Santacruz. Bollywood celebrities visited to offer condolences. The family is in mourning.