सोनू निगमची मोठी डील! तब्बल 'इतक्या' कोटींना विकली कर्जतमधील जमीन; आकडा वाचून विस्फारतील डोळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:11 IST2026-04-15T15:10:03+5:302026-04-15T15:11:36+5:30
सोनू निगमच्या कर्जतमधील जमिनीचा मोठा व्यवहार! एवढ्या किंमतीत झाली डील

सोनू निगमची मोठी डील! तब्बल 'इतक्या' कोटींना विकली कर्जतमधील जमीन; आकडा वाचून विस्फारतील डोळे
Sonu Nigam: ९० च्या दशकापासून आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर लोकांच्या हृदयावर राज्य करणारा व गाण्यासोबतच अभिनयाक्षेत्रातही नाव कमावणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक म्हणजे सोनू निगम.अत्यंत कमी वयात गायनातील करिअर सुरु करुन अल्पावधीतच पार्श्वगायक म्हणून एक वेगळीच उंची त्याने गाठली आहे. सध्या सोनू निगम त्याने केलेल्या आर्थिक व्यवहारामुळे चर्चेत आला आहे.गेल्या काही काळात
बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांनी रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक केल्याचं पाहायला मिळालं. तर काहींनी त्यांची मालमत्ता विकून कोट्यवधींचा नफा कमावला. या यादीत आता सोनू निगमचा देखील समावेश झाला आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकताच सोनू निगमने त्याच्या कर्जत येथीस जमिनीचा मोठा व्यवहार केला आहे.गायक सोनू निगमने कर्जत येथील १.९ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेली जमीन १.९५ कोटी रुपयांना विकली आहे. कर्जत येथील सावेळे गावाजवळ असलेला भूखंड त्याने चार वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विकला आहे. नोंदणी कागदपत्रांनुसार, व्यवहार ७ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आला आहे. तसंच या व्यवहारासाठी एकूण ११.७० लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आलं आहे. दरम्यान, सोनू निगमने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
सोनू निगमची मालकी असलेल्या त्या जमिनीचा ०.७१८ हेक्टरचा भाग ७५ लाख रुपयांना विकला गेला. उर्वरित दोन भूखंड प्रत्येकी ५० लाख रुपयांना विकले गेले, तर ०.२०८ हेक्टरचा जमिनीचा एक लहान भाग २० लाख रुपयांना विकण्यात आला.मुंबईजवळ असलेले कर्जत, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि निसर्गरम्य वातावरणामुळे अलिकडच्या वर्षांत रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी पंसतीच ठिकाण ठरत आहे.