दमदार सस्पेन्स अन्...; माधुरी दीक्षितच्या आगामी 'माँ बहन' सिनेमाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित,'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 14:06 IST2026-05-15T14:00:24+5:302026-05-15T14:06:32+5:30
वाढदिवशी माधुरी दीक्षितचं चाहत्यांना खास सरप्राइज; आगामी 'माँ बहन' सिनेमाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, कधी होणार रिलीज?

दमदार सस्पेन्स अन्...; माधुरी दीक्षितच्या आगामी 'माँ बहन' सिनेमाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित,'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
Madhuri Dixit Upcoming Film: बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलेली व आजही अनेक तरुणांना आपल्या सौंदर्याने मोहून टाकणारी अशी अभिनेत्री म्हणजे माधुरी दिक्षित.९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली. जगभरात माधुरीचे लाखो-करोडो चाहते आहेत.आज १५ मे रोजी अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
माधुरी दीक्षितच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'माँ बहन'आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. निर्मात्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं,"धक धक हो रही हैं...? तारीख नोट करलो 'माँ बहन' ४ जूनपासून फक्त नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल." या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'माँ बहन' या डार्क कॉमेडी चित्रपटाची घोषणा २०२६ च्या सुरुवातीला झाली होती, पण आज त्याच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.
दरम्यान, या चित्रपटात माधुरी दीक्षितसह तृप्ती डिमरी आणि अभिनेत्री धर्ना दुर्गा देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटात माधुरीच्या मुलींची भूमिका साकारत आहेत. अभिनेते रवी किशन सुद्धा चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा या चौघांभोवती फिरते. 'तुम्हारी सुलू' या चित्रपटासाठी ओळखले जाणारे सुरेश त्रिवेणी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.