"माझ्या डोळ्यांदेखत त्या व्यक्तीचा मृत्यू...", अजय देवगणने सांगितला अपघाताचा 'तो' भीषण प्रसंग, असं काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:18 IST2025-11-17T12:15:34+5:302025-11-17T12:18:02+5:30
"माझ्या समोरच त्याचा मृत्यू...", स्कायडायव्हिंग करणाऱ्या व्यक्तीच्या निधनाचा 'तो' प्रसंग सांगताना अजय देवगण भावुक

"माझ्या डोळ्यांदेखत त्या व्यक्तीचा मृत्यू...", अजय देवगणने सांगितला अपघाताचा 'तो' भीषण प्रसंग, असं काय घडलेलं?
Ajay Devgn: हिंदी चित्रपटांच्या दुनियेत यशस्वी आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून नाव कमाविणारा अभिनेता अजय देवगणने आपली अभिनय प्रतिभा सिध्द करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपल्या करिअरची सुरुवात बाईकवरील एका साहसी दृश्याने करत त्याने इंडस्ट्रीत धमाकेदार एन्ट्री केली.बॉलिवूडचा 'ॲक्शन हिरो' अजय देवगण आजही आपल्या स्टंट्समुळे चर्चेत असतो. सध्या या अभिनेत्याची त्याच्या दे दे प्या दे-२ या चित्रपटामुळे सगळीकडे चर्चा आहे. याचदरम्यान तो वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसतो आहे. अलिकडेच त्याने एका भयानक स्कायडायव्हिंग घटनेबद्दल सांगितले आहे.
'दे दे प्यार दे-२' च्या निमित्ताने अलिकडेच अजय देवगण आणि आर.माधवन यांनी माध्यमांशी बातचीत केली. यावेळी आर. माधवनने अजयच्या धाडसी स्वभावावर प्रकाश टाकला. दे दे प्यार दे २ ' चित्रपटातील एका सीनसाठी अजयने कोणत्याही सरावाशिवाय थेट विमानातून उडी मारली होती,असा किस्सा त्याने शेअर केला. यानंतर अजय देवगणने त्याच्या ट्रेनिंगदरम्यान घडलेला एक भयावह प्रसंग सांगितला. ज्याबद्दल आजही आठवलं तरी अंगावर काटा येतो, असं अभिनेत्याने सांगितलं.
दे दे प्यार दे २ च्या प्रमोशनवेळी अजय देवगण म्हणाला, "जसा मी तिथे पोहोचलो तेव्हा मी एका व्यक्तीला पॅराशूट उघडला नाही खाली पडताना पाहिलं. आणि माझ्या डोळ्यांदेखत त्याचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीनंतर मला स्कायडायव्हिंग करायची होती." त्यानंतर अजय देवगणने लिओनार्डो डिकैप्रियोसोबत घडलेल्या घटनेचा उल्लेख करत म्हणाला, लिओनार्डो डिकैप्रियोसोबती अशीच घटना घडली होती. मात्र, त्याच्या ट्रेनरमुळे त्याचा जीव वाचला."
अजय देवगणच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्याची प्रमुख भूमिका असलेला दे दे प्यार दे २ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात रकुल प्रीत सिंह, आर. माधवन, गौतमी कपूर, मीजान जाफरी आणि इशिता दत्ता असे या कलाकारांच्या देखील भूमिका आहेत.