राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या लेकीचं झालं बारसं; ठेवलंय 'हे' खास नाव, चाहत्यांकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 11:28 IST2026-01-18T11:27:24+5:302026-01-18T11:28:43+5:30
राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या मुलीचं बारसं झालं आहे. या सेलिब्रिटी जोडप्याने लेकीचं नाव खूप खास ठेवलं आहे

राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या लेकीचं झालं बारसं; ठेवलंय 'हे' खास नाव, चाहत्यांकडून कौतुक
राजकुमार राव आणि पत्रलेखा या सेलिब्रिटी जोडप्याच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वी नवी पाहुणी आली. लग्नाच्या वाढदिवशीच दोघांच्या घरी लेकीचं आगमन झालं. त्यामुळे दोघांच्या आनंदाला उधाण आलं. अशातच आज राजकुमार आणि पत्रलेखा या दोघांनी लेकीचा चिमुकला हात हातात घेऊन एक फोटो पोस्ट केला. या फोटोसोबतच त्यांनी लेकीचं नावही सांगितलं. राजकुमार आणि पत्रलेखाने लेकीचं खास नाव ठेवलं आहे.
राजकुमार-पत्रलेखाच्या लेकीचं बारसं
राजकुमार आणि पत्रलेखाने लेकीचं नाव ठेवलं आहे पार्वती. ''अत्यंत नम्रपणे हात जोडून आणि मनापासून आम्ही आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या आशीर्वादाची तुम्हाला ओळख करुन देत आहोत. पार्वती पॉल राव'', अशा शब्दांत राजकुमारने लेकीच्या नावाचा उलगडा केला आहे. सध्या विचित्र आणि अवघड नावांचा ट्रेंड सुरु असतानाच राजकुमार-पत्रलेखाने लेकीचं सोपं आणि सुंदर नाव ठेवल्याने सर्वांनी या सेलिब्रिटी जोडप्याचं कौतुक केलं आहे.
अनेकांना प्रश्न पडला आहे की, पार्वती पॉल राव या नावामध्ये 'पॉल' हे आडनाव कोणाचं आहे. तर राजकुमारने पत्नीच्या आडनावाचा सन्मान करत ते आडनावही मुलीसोबत जोडलं आहे. याशिवाय स्वतःचं आडनाव राजकुमारने शेवटी ठेवलं आहे. राजकुमारची पत्नी पत्रलेखाचं आडनाव 'पॉल' आहे. त्यामुळे पार्वती पॉल रॉय अशी त्यांनी मुलीची ओळख करुन दिली आहे. सर्वांनी या जोडप्याला आणि त्यांच्या लेकीला भरभरुन आशीर्वाद आणि प्रेम दिलं आहे.