बप्पीदाच्या नातवाने गायले इंग्लिश गाणे; स्टाइलवर चाहते झाले फिदा; पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 16:21 IST2018-05-02T10:06:31+5:302018-05-02T16:21:49+5:30

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक बप्पीदाच्या नातवाने अतिशय हटके अंदाजात एक इंग्लिश गीत गायले. त्याची स्टाइल बघून चाहते फिदा झाले.

Bappidas' granddaughter sings; Fighter on the styling; Watch video! | बप्पीदाच्या नातवाने गायले इंग्लिश गाणे; स्टाइलवर चाहते झाले फिदा; पाहा व्हिडीओ!

बप्पीदाच्या नातवाने गायले इंग्लिश गाणे; स्टाइलवर चाहते झाले फिदा; पाहा व्हिडीओ!

लिवूडचे दिग्गज गायक बप्पी लाहिरी आपल्या स्टायलिश अंदाज आणि गाण्यांसाठी ओळखले जातात. त्यांनी गायिलेली बरेचशी गाणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आता त्यांचा हाच अंदाज त्यांच्या नव्या पिढीमध्ये बघावयास मिळत आहे. होय, आम्ही त्यांच्या नातवाविषयी सांगत आहोत. त्यांच्या नातवाने काहीसे त्यांच्याच अंदाजात एक इंग्लिश गाणे गायले आहे. यामध्ये या गाण्यात त्याने आपल्या आजोबांची हुबेहूब कॉपी केली आहे. यावेळी त्यांचा नातू स्वास्तिक बन्सलने काळा चष्मा आणि काळे शर्ट परिधान करून मस्तीच्या अंदाजात हे गाणे गायले. स्वास्तिकमध्ये त्याचे आजोबा बप्पीदाचीच झलक बघावयास मिळाली. 

दरम्यान, बप्पी लाहिरी यांना त्यांच्या प्रसिद्ध गीत ‘जिम्मी जिम्मी आजा आजा’ या गाण्यासह वैश्विक संगीतात योगदान दिल्याबद्दल लंडनच्या वर्ल्ड बुक आॅफ रिकॉर्ड्सतर्फे नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. याविषयी बप्पीदाने मीडियाला सांगितले की, जवळपास पाच दशके आणि सहाशेपेक्षा अधिक चित्रपटांचा हा लांब प्रवास आहे. या प्रवासात ‘जिम्मी जिम्मी’ आजही माझ्यासाठी स्पेशल आहे. कारण या गाण्याला जगातील कानाकोपºयात आजही फॉलो केले जाते. त्यातच अशाप्रकारचे जेव्हा प्रेम मिळते तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू येतात. हे माझ्या चाहत्यांचे प्रेम असून, मला पुढे जाण्यास प्रेरणा देते. 
 

१९८२ मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्तीच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटातील ‘जिम्मी जिम्मी आजा आजा’ हे गाणे असून, अजूनही त्याची लोकप्रियता अफाट आहे. त्याचबरोबर रूसी आणि चिनी भाषांमध्ये या गाण्याचा अनुवादही करण्यात आला आहे. त्याचबरोबर एडम सॅण्डलरच्या ‘यू डू नॉट मेस विद जोहान’ या मूळ गाण्याचा भागही राहिले आहे. 

Web Title: Bappidas' granddaughter sings; Fighter on the styling; Watch video!