‘बाबूमोशाय बंदूकबाज’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमधून रडत रडत बाहेर पडली दिव्या दत्ता!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 21:31 IST2017-07-12T15:59:28+5:302017-07-12T21:31:08+5:30

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याच्या आगामी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले असून, त्यामध्ये नवाजुद्दीनचा अंदाज खूप पसंत ...

'Babukoshaya Gunjapar' trailer launches in the launch event, crying out loud crying Divya !! | ‘बाबूमोशाय बंदूकबाज’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमधून रडत रडत बाहेर पडली दिव्या दत्ता!!

‘बाबूमोशाय बंदूकबाज’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमधून रडत रडत बाहेर पडली दिव्या दत्ता!!

िनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याच्या आगामी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले असून, त्यामध्ये नवाजुद्दीनचा अंदाज खूप पसंत केला जात आहे. ट्रेलरमध्ये त्या सर्व गोष्टी आहेत, ज्यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावू शकेल. त्यातच आतापर्यंत कधीही न बघितलेला नवाज भाईचा दमदार अंदाज प्रेक्षकांना वेड लावणारा आहे. गेल्या काळातील चित्रपटांमध्ये कधी बघण्यात आला नाही, असे काहीसे सीन्स या ट्रेलरमध्ये असल्याने सर्वत्र या चित्रपटाविषयी चर्चा रंगत आहे. त्याचबरोबर चित्रपटातील अभिनेत्री दिव्या दत्ता हिच्याविषयीही सध्या एक चर्चा रंगत असल्याने प्रेक्षक यावरून हैराण झाले आहेत. 

त्याचे झाले असे की, निर्मात्यांनी ट्रेलर लॉन्चसाठी एका इव्हेंटचे आयोजन केले होते; मात्र या इव्हेंटमधून दिव्या रडत रडत बाहेर पडली. वास्तविक दिव्याला तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखले जाते. असाच काहीसा बिनधास्त अंदाज तिचा या चित्रपटातही बघावयास मिळत आहे. मग असे काय घडले की, दिव्याला रडत रडत इव्हेंटमधून बाहेर पडावे लागले? सूत्रानुसार इव्हेंटदरम्यान चित्रपट निर्मात्यांनी दिव्याला अजिबातच महत्त्व दिले नाही. त्यामुळे ती खूपच अस्वस्थ झाली. असेही ऐकावयास मिळत आहे की, जेव्हा दिव्याने या इव्हेंटमधून काढता पाय घेतला तेव्हा तिला कोणीही थांबविले नाही. त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू आले. 

मात्र इंडिया डॉट कॉमने याविषयी अधिक माहिती घेतली असता, वेगळाच किस्सा समोर आला. दिव्याने सांगितले की, मी ट्रेलर लॉन्च इव्हेंट कार्यक्रमासाठी बºयाचसा वेळ दिला. परंतु हा इव्हेंट वेळेवर सुरू झाला नाही. त्यामुळे मी तेथून निघून आली. तुम्हाला वाटते काय की, मी एवढ्याशा गोष्टीसाठी रडणार? असो, दिव्या म्हणतेय म्हणून काही वेळासाठी आपण विश्वास ठेवूया. परंतु एवढ्या छोट्या गोष्टीसाठी खरंच दिव्या रडणार काय? त्यामुळे हे प्रकरण वेगळे तर नाही ना? अशी शंका आल्यास नवल वाटू नये. 

Web Title: 'Babukoshaya Gunjapar' trailer launches in the launch event, crying out loud crying Divya !!