शाहरूख, आमीरला लग्नाचे निमंत्रण देताना अनुष्का शर्माला ‘सुलतान’ सलमान खानचा पडला विसर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 21:56 IST2017-12-09T16:26:38+5:302017-12-09T21:56:38+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या सर्वत्र ऐकावयास मिळत आहेत. लग्नात ...

Anushka Sharma's 'Sultan' Salman Khan's fall remembers Shahrukh, Amir's wedding invitation! | शाहरूख, आमीरला लग्नाचे निमंत्रण देताना अनुष्का शर्माला ‘सुलतान’ सलमान खानचा पडला विसर!

शाहरूख, आमीरला लग्नाचे निमंत्रण देताना अनुष्का शर्माला ‘सुलतान’ सलमान खानचा पडला विसर!

रतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या सर्वत्र ऐकावयास मिळत आहेत. लग्नात उपस्थित राहणाºया पाहुण्यांपासून ते वेन्यू प्लेसपर्यंतची चर्चा रंगत आहे. असे म्हटले जात आहे की, विरुष्का याच महिन्यात विवाहाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे लग्नाची गेस्ट लिस्ट तयार करण्यात आली असून, त्यामध्ये बॉलिवूडसह क्रिकेट जगतातील मोजक्याच नावांचा समावेश आहे. यामध्ये किंग शाहरूख खान, आमीर खान या दिग्गज स्टार्सचीही नावे आहेत. परंतु सुलतान सलमान खानचे नाव या लिस्टमध्ये नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

खरं तर सलमानचे नाव नसणे ही बातमीच आश्चर्यचकित करणारी आहे. कारण आमीर, शाहरूखला निमंत्रित केल्यानंतर सलमानला का निमंत्रण दिले गेले नाही, यावरून आता चर्चा रंगत आहे. परंतु यामागे एक खास कारण असल्याचे आता समोर येत आहे. हे कारण जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही काळ फ्लॅशबॅकमध्ये जावे लागणार आहे. तुम्हाला आठवतेय काय की, ‘सुलतान’च्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्काच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या होत्या? होय, तुम्ही अगदी बरोबर विचार करीत आहात. त्याचे झाले असे की, त्यावेळी आॅस्ट्रेलियाचा दौरा संपल्यानंतर विराटने श्रीलंका दौºयातून सुटी घेतली होती. विराटने अनुष्कासोबत विदेशात सुट्या एन्जॉय करण्यासाठी जाण्याचा प्लॅन केला होता. 



परंतु, त्याचदरम्यान अनुष्का तिच्या ‘सुलतान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. तिने विराटला प्लॅन रद्द करण्यास स्पष्ट शब्दात सांगितले होते. त्यामुळे त्यावेळी विराट अनुष्कावर प्रचंड नाराज झाला होता. त्यानंतर दोघांमधील नाराजी संपली. तो राग अजूनही विराटच्या मनात कायम असावा, असेच काहीसे दिसत आहे. त्यामुळेच ट्रिप कॅन्सल केल्याचा बदला म्हणून विराटने सलमानला लग्नाचे निमंत्रित करणे टाळले असावे. अर्थात हा अंदाज असून, यात नेमके काय तथ्य आहे हे विराट आणि अनुष्कालाच माहिती आहे. असो, अनुष्काने तिच्या लग्नासाठी शाहरूख खान, आमीर खान, आदित्य चोपडा, करण जोहर, रणवीर कपूर, कॅटरिना कैफ, मनीष शर्मा यांना निमंत्रित केल्याचे समजते. 

Web Title: Anushka Sharma's 'Sultan' Salman Khan's fall remembers Shahrukh, Amir's wedding invitation!