ओह.. बच्चन साहब क्या कर रहे हो? अमिताभ यांनी मध्यरात्री शेअर केलेल्या फोटोवर रणवीरची कमेंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 02:00 PM2020-09-03T14:00:30+5:302020-09-03T14:01:12+5:30

अमिताभ बच्चन यांनी नुकताच रात्री १२ वाजताच्या दरम्यान एक फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. हा फोटो मिड नाइट स्नॅक्सचा आहे. त्यांच्या या फोटोवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी मजेदार रिअ‍ॅक्शन दिल्या आहेत.

Amitabh Bachchan shares his mid night snack photo, Celebrity post funny comments | ओह.. बच्चन साहब क्या कर रहे हो? अमिताभ यांनी मध्यरात्री शेअर केलेल्या फोटोवर रणवीरची कमेंट!

ओह.. बच्चन साहब क्या कर रहे हो? अमिताभ यांनी मध्यरात्री शेअर केलेल्या फोटोवर रणवीरची कमेंट!

googlenewsNext

महानायक अमिताभ बच्चन हे काही दिवसांपूर्वी कोरोनातून रिकव्हर झाले आहेत. हॉस्पिटलमधून घरी परतल्यानंतर ते पुन्हा एकदा सोशल मीडियावर अॅक्टिव झाले असून वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत आहेत. त्यांनी नुकताच रात्री १२ वाजताच्या दरम्यान एक फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. हा फोटो मिड नाइट स्नॅक्सचा आहे. त्यांच्या या फोटोवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी मजेदार रिअ‍ॅक्शन दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी फोटोसोबत लिहिले आहे की, रात्री १२ वाजता हे खाण्याची मजा आहे, ती कुठेच नाही. जशी त्यांनी ही पोस्ट शेअर केली. त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये सेलिब्रिटींच्या आणि त्यांच्या फॅन्सच्या मजेदार कमेंट येऊ लागल्या.

अभिनेत्री कृती सॅननने लिहिले की, माझं फेवरेट. तर अभिनेता रणवीर सिंहने लिहिले की, 'ओह बच्चन साहब!!! उफ्फ ये क्या कर रहे हो आप?. तर अभिनेत्री मौनी रॉयने लाळ गाळत असलेला इमोजी कमेंट केला.

कार घेऊन झाले ट्रोल...

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या घरी अलीकडे एक नवा सदस्य आला. बिग बींनी स्वत: याची माहिती दिली होती. हा नवा सदस्य कोण तर त्यांची नवी कोरी अलिशान गाडी. अमिताभ यांच्याकडे असलेल्या अलिशान व महागड्या गाड्यांच्या ताफ्यात आणखी एका कारची भर पडली आहे. त्यांनी नवी लक्झरी मर्सिडीज एस-क्लास ही कार खरेदी केली आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यात अमिताभ आपल्या नव्या कारसोबत दिसत आहेत. नव्या कारसोबत भलेही आनंदात दिसत आहेत. पण सोशल मीडियावरच्या लोकांना त्यांचा हा आनंद भावला नाही. हे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर अमिताभ ट्रोल झालेत.

‘इतका पैसा होता तर तो डोनेट करायचा़ मरताना पैसा थोडीच घेऊन जाणार?’, असे एका युजरने लिहिले. तर अन्य एका युजरने ‘इतके शो ऑफ का करत आहात?’ अशी प्रतिक्रिया दिली. काही युजर्सनी अमिताभ यांना सोनू सूदचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला. 

‘आत्ताही नवी कार पाहून एखाद्या मुलासारखे खूश होत आहात. मोठे व्हा बॉस. काही तर करा. सोनू सूदने लोकांच्या मदतीसाठी कोट्यवधी रूपये खर्च केलेत आणि अमिताभ एका कारवर कोट्यवधी रूपये खर्च करत आहेत,’ असे या युजरने लिहिले. आणखी एकाने ‘सोनू सूदसारखे स्टार बना, अशाप्रकारे नाही,’ असे अमिताभ यांना सुनावले.

हे पण वाचा :

बडे हो जाओ बॉस...! अमिताभ बच्चन यांच्या घरी आली नवी कार, पण युजर्सनी घेतला क्लास!!

‘एंग्जायटी’शी लढतेय अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदा, म्हणाली...

Web Title: Amitabh Bachchan shares his mid night snack photo, Celebrity post funny comments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.