बडे हो जाओ बॉस...! अमिताभ बच्चन यांच्या घरी आली नवी कार, पण युजर्सनी घेतला क्लास!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 10:05 AM2020-09-02T10:05:59+5:302020-09-02T10:08:23+5:30

सोशल मीडियावर अमिताभ जबरदस्त ट्रोल

amitabh bachchan buys new mercedes s class car trollers troll him on social media | बडे हो जाओ बॉस...! अमिताभ बच्चन यांच्या घरी आली नवी कार, पण युजर्सनी घेतला क्लास!!

बडे हो जाओ बॉस...! अमिताभ बच्चन यांच्या घरी आली नवी कार, पण युजर्सनी घेतला क्लास!!

googlenewsNext
ठळक मुद्देअमिताभ यांना गाड्यांची खूप आवड आहे, हे तर सर्वांना माहित आहे. अमिताभ यांच्याकडे अनेक लक्जरी कारचा समावेश आहे.

अमिताभ बच्चन यांच्या घरी अलीकडे एक नवा सदस्य आला. बिग बींनी स्वत: याची माहिती दिली होती. हा नवा सदस्य कोण तर त्यांची नवी कोरी अलिशान गाडी. अमिताभ यांच्याकडे असलेल्या अलिशान व महागड्या गाड्यांच्या ताफ्यात आणखी एका कारची भर पडली आहे. त्यांनी नवी लक्झरी मर्सिडीज एस-क्लास ही कार खरेदी केली आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यात अमिताभ आपल्या नव्या कारसोबत दिसत आहेत. नव्या कारसोबत भलेही आनंदात दिसत आहेत. पण सोशल मीडियावरच्या लोकांना त्यांचा हा आनंद भावला नाही. हे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर अमिताभ जबरदस्त ट्रोल झालेत.

‘इतका पैसा होता तर तो डोनेट करायचा़ मरताना पैसा थोडीच घेऊन जाणार?’, असे एका युजरने लिहिले. तर अन्य एका युजरने ‘इतके शो ऑफ का करत आहात?’ अशी प्रतिक्र्रिया दिली. काही युजर्सनी अमिताभ यांना सोनू सूदचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला. 

‘आत्ताही नवी कार पाहून एखाद्या मुलासारखे खूश होत आहात. मोठी व्हा बॉस. काही तर करा. सोनू सूदने लोकांच्या मदतीसाठी कोट्यवधी रूपये खर्च केलेत आणि अमिताभ एका कारवर कोट्यवधी रूपये खर्च करत आहेत,’ असे या युजरने लिहिले. आणखी एकाने ‘सोनू सूदसारखे स्टार बना, अशाप्रकारे नाही,’ असे अमिताभ यांना सुनावले.

इतकी आहे गाडीची किंमत
अमिताभ यांनी जी कार खरेदी केली ती काल 1 सप्टेंबरला भारतात लॉन्च झाली आहे. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, या कारची किंमत 1 कोटी 38 लाख आहे. अमिताभ यांच्या नावावर ही कार रजिस्टर आहे.

अमिताभ यांच्यावर अनेक कार
अमिताभ यांना गाड्यांची खूप आवड आहे, हे तर सर्वांना माहित आहे. अमिताभ यांच्याकडे अनेक लक्जरी कारचा समावेश आहे. यामध्ये लँड रोव्हार, रेंज रोव्हर, लिक्सस आणि बेंटले कॉन्टिनेंटल जीटी या गाड्या अमिताभ यांच्याकडे आहेत. मर्सिडिझ एसएल५००, लेक्सस एक्स ४७०, बीएमडब्ल्यू एक्स ५, बीएमडब्ल्यू ७ सीरीज आणि मर्सिडिझ एस ३२० आदी कार अमिताभ यांच्या बंगल्यातील पार्किंगची शोभा वाढवित आहेत.

Web Title: amitabh bachchan buys new mercedes s class car trollers troll him on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.