श्रीदेवी यांच्या अंत्यसंस्कारानंतर कपूर परिवाराने मानले चाहत्यांचे आभार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 22:12 IST2018-02-28T16:42:23+5:302018-02-28T22:12:23+5:30

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर काही वेळापूर्वीच मुंबईतील विलेपार्ले स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. पती बोनी कपूर यांनी त्यांच्या ...

After the funeral of Sridevi, thanks to the fans of the Kapoor family! | श्रीदेवी यांच्या अंत्यसंस्कारानंतर कपूर परिवाराने मानले चाहत्यांचे आभार!

श्रीदेवी यांच्या अंत्यसंस्कारानंतर कपूर परिवाराने मानले चाहत्यांचे आभार!

लिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर काही वेळापूर्वीच मुंबईतील विलेपार्ले स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. पती बोनी कपूर यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. ज्यानंतर श्रीदेवी पंचत्वात विलीन झाल्या. श्रीदेवी यांच्यावर अंत्यसंस्कार केल्याच्या काही वेळानंतरच कपूर परिवाराकडून एक अधिकृत स्टेटमेंट मीडियात जाहिर करण्यात आले. ज्यामध्ये संपूर्ण देशवासियांचे आभार मानले आहेत. 

स्टेटमेंटनुसार, ‘आमच्या परिवारासाठी गेले काही दिवस खूपच दु:खद राहिले आहेत. विशेषत: आजचा दिवस आमच्या परिवारासाठी खूपच दु:खद  राहिला आहे. आज आमच्या परिवारातील सर्वाधिक प्रेमळ सदस्याला अखेरचा निरोप द्यावा लागला. श्रीदेवी आपल्या मागे एक मोठे कुटुंब सोडून गेल्या. त्यांच्या प्रतिभेला काही मोल नाही. त्या सौंदर्याच्या एक मिसाल होत्या. ज्या पद्धतीने त्या प्रेक्षकांशी नातं जोडायच्या तसे करणे प्रत्येकाला शक्य नाही. श्रीदेवी यांच्या त्यांच्या कुटुंबीयांशी देखील एक अतुन नाते होते.’


गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या कुटुंबांची ज्यांनी मदत केली ते त्यांचे चाहते आहेत. श्रीदेवी यांच्या चाहत्यांकडून आम्हाला खूप प्रेम मिळाले. श्रीदेवी यांचा मित्र परिवार आणि चाहत्यांनी सातत्याने आमच्या परिवारावर प्रेम केले. या स्टेटमेंटमध्ये श्रीदेवी यांच्या दोन्ही मुलींना दिलेल्या भरभरून प्रेमाचाही उल्लेख केला. यावेळी माध्यमांना विनंती करण्यात आली की, कपूर परिवाराच्या या दु:खद क्षणी त्यांनी सहकार्य करावे. 

Web Title: After the funeral of Sridevi, thanks to the fans of the Kapoor family!