अदनान सामीने मुलगी मदिनाचा पहिंला वाढदिवस केला साजरा, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 16:40 IST2018-05-10T11:10:12+5:302018-05-10T16:40:12+5:30

प्रसिद्ध गायक अदनान सामी आणि त्याची पत्नी रोया फरयाबी यांनी नुकतेच मुलगी मदिना हिचा पहिला बर्थ डे सेलिब्रेट केला. ...

Adnan Sami celebrates her first birthday on Madinah, see photo! | अदनान सामीने मुलगी मदिनाचा पहिंला वाढदिवस केला साजरा, पाहा फोटो!

अदनान सामीने मुलगी मदिनाचा पहिंला वाढदिवस केला साजरा, पाहा फोटो!

रसिद्ध गायक अदनान सामी आणि त्याची पत्नी रोया फरयाबी यांनी नुकतेच मुलगी मदिना हिचा पहिला बर्थ डे सेलिब्रेट केला. अदनान सध्या जर्मनी येथे असून, त्याठिकाणीच त्याने मुलीचा बर्थ डे सेलिब्रट केला. याबाबतचे काही फोटोज् समोर आले असून, त्यामध्ये अदनान पत्नी रोयासोबत केक कापताना दिसत आहे. यावेळी अदनानने मुलीसाठी ट्विटरवर एक मोठी पोस्टही शेअर केली. मदिना अदनानच्या तिसºया पत्नीची पहिली मुलगी आहे. हिचा जन्म ९ मार्च २०१७ रोजी झाला. 





अदनानला म्युझिकसाठी त्याच्या आउटस्टॅँडिंग अचिव्हमेंटसाठी ब्रिटिश पार्लामेंट हाउस आॅफ लॉडर््सच्या वतीने एशियन अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले आहे. डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने अदनानला इंडियन सिटीजनशिप मंजूर केली होती. त्यानंतर १ जानेवारी २०१६ मध्ये ती लागू करण्यात आली. दरम्यान, अदनानची पत्नी रोया मूळची अफगानची असून, जर्मनी येथे राहणार आहे. ती अदनानची तिसरी पत्नी आहे. या दोघांचे लग्न २९ जून २०१० मध्ये झाले होते. 





या अगोदर अदनानने १९९३ मध्ये अभिनेत्री जेबा बिख्तयार हिच्याशी लग्न केले होते. त्यांना अजान सामी खान नावाचा मुलगाही आहे. तीन वर्षांनंतर या दोघांचा घटस्फोट झाला. अदनाने त्यानंतर सबाहशी लग्न केले. तिच्याशीदेखील त्याचा घटस्फोट झाला. 

Web Title: Adnan Sami celebrates her first birthday on Madinah, see photo!