सनी देओलच्या 'बॉर्डर-२' मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी; कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:36 IST2025-06-13T17:29:41+5:302025-06-13T17:36:00+5:30

भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असलेला 'बॉर्डर' हा चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय आहे.

actress sonma bajwa entry in sunny deol and varun dhawan starrer border 2 movie says report | सनी देओलच्या 'बॉर्डर-२' मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी; कोण आहे ती?

सनी देओलच्या 'बॉर्डर-२' मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी; कोण आहे ती?

Border 2 Movie: 'गदर-२' आणि 'जाट' यांसारख्या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता सनी देओल आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट म्हणजे 'बॉर्डर-२' आहे.  या चित्रपटात सनी देओलसह वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी अशा तगड्या कलाकारांची फळी पाहायला मिळणार. परंतु या बहुचर्चित चित्रपटात फिमेल लीडमध्ये कोण असणार? याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षकांना  उत्सुकता निर्माण झाली होती. यासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, अनुराग सिंह दिग्दर्शित 'बॉर्डर-२' मध्ये अभिनेत्री सोनम बाजवाची एन्ट्री झाल्याचं म्हटलं जात आहे. या बिग बजेट चित्रपटात सोनम एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री जूनच्या अखेरीस या चित्रपटाचं शूटिंग सुरू करेल, असंही सांगण्यात येत आहे. 'बॉर्डर-२' मध्ये सोनम एका पंजाबी मुलीची भूमिका साकारताना दिसण्याची शक्यता आहे. तसेच दिलजीत दोसांझसोबत ती स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. दरम्यान, याबाबत सोनम बाजवा किंवा 'बॉर्डर-२' च्या निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

दरम्यान, १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धावर आधारित असलेला 'बॉर्डर' हा चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय आहे. त्यामुळे याच्या सीक्वलबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. आता जवळपास २७ वर्षांनंतर 'बॉर्डर २' चित्रपटाची घोषणा करण्यात आली. सध्या 'बॉर्डर २' सिनेमाचं शूटिंग  डेहराडूनमधील हलदुवाला येथे सुरू आहे. या चित्रपटाचं ६० टक्के शूटिंग पूर्ण झालं आहे. हा चित्रपट जेपी दत्ता, निधी दत्ता आणि टी-सीरीज प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनवला जात आहे. 'बॉर्डर-२' पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त २३ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.

Web Title: actress sonma bajwa entry in sunny deol and varun dhawan starrer border 2 movie says report