शाळेच्या कार्यक्रमात वडील शाहरुख खानची आयकॉनिक पोझ देताना दिसला अबराम, अभिनेत्याने दिली ही रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 10:05 AM2023-12-16T10:05:17+5:302023-12-16T10:05:59+5:30

Shah Rukh Khan's Son Abram : शाहरुख खान त्याच्या कुटुंबासह मुलगा अबराम खानच्या शाळेतील कार्यक्रमात सहभागी झाला होता, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Abram seen striking father Shahrukh Khan's iconic pose at a school function, actor gives this reaction | शाळेच्या कार्यक्रमात वडील शाहरुख खानची आयकॉनिक पोझ देताना दिसला अबराम, अभिनेत्याने दिली ही रिअ‍ॅक्शन

शाळेच्या कार्यक्रमात वडील शाहरुख खानची आयकॉनिक पोझ देताना दिसला अबराम, अभिनेत्याने दिली ही रिअ‍ॅक्शन

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख(Shah Rukh Khan)चा २०२३ सालातील तिसरा चित्रपट 'डंकी' (Dunki Movie) रिलीजसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची चर्चा आहे. मात्र, शाहरूख इतका सुपरस्टार आहे की, त्याचा चित्रपट फ्लॉप असो की हिट असो की ब्लॉकबस्टर, याने चाहत्यांना काही फरक पडत नाही. किंग खानच्या आयकॉनिक पोझचे चाहते वेडे आहेत. बऱ्याचदा त्याचे चाहते त्या पोझमध्ये व्हिडीओ आणि फोटो काढताना दिसतात. दरम्यान, आता त्याचा मुलगा अबराम खाननेही शाळेच्या कार्यक्रमात वडिलांच्या या आयकॉनिक पोझची कॉपी केली. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या शाहरुख खाननेही प्रतिक्रिया दिली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहरुख खान युनिव्हर्स फॅन क्लब अर्थात ट्विटरच्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अबराम स्टेजवर एका नाटकात काम करताना दिसत आहे. तर वडील शाहरुख खान, आई गौरी खान आणि बहीण सुहाना खान त्याला चिअर अप करताना दिसत  आहेत. दरम्यान, अबरामने जेव्हा त्याच्या वडिलांची आयकॉनिक पोज दिली तेव्हा शाहरुख खान आनंदाने हात वर करताना दिसतो आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये चाहत्यांच्या लक्षात आलेली आणखी एक खास गोष्ट म्हणजे सुहाना खान अगस्त्य नंदासोबत बसलेली दिसत आहे. ज्याच्यासोबत तिच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सुहाना खानचा द आर्चीज हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये ती अगस्त्य नंदा आणि खुशी कपूरसोबत अभिनयात पदार्पण करताना दिसत आहे.

Web Title: Abram seen striking father Shahrukh Khan's iconic pose at a school function, actor gives this reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.