'किंग'च्या सेटवरुन व्हिलनच्या भूमिकेतील अभिषेक बच्चनचाही फोटो लीक, पण होतोय ट्रोल कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:31 IST2026-05-14T12:29:05+5:302026-05-14T12:31:48+5:30
अभिषेक बच्चन आतापासूनच का होतोय ट्रोल?

'किंग'च्या सेटवरुन व्हिलनच्या भूमिकेतील अभिषेक बच्चनचाही फोटो लीक, पण होतोय ट्रोल कारण...
शाहरुख खानचा आगामी बहुचर्चित 'किंग' सिनेमात अभिषेक बच्चनचीही भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या सेटवरुन शाहरुख आणि दीपिकाचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्याआधी टीझरमधून शाहरुखचा लूक तर समोर आलाच होता. आता अभिषेक बच्चनचाही निगेटिव्ह भूमिकेतला लूक समोर आला आहे. त्याला खतरनाक व्हिलनच्या भूमिकेत पाहून चाहतेही अचंबित झाले आहेत.
'किंग' सिनेमात शाहरुख खान त्याची लेक सुहानासोबत दिसणार आहे. पहिल्यांदाच बापलेक एकत्र काम करणार आहेत. अद्याप सुहाना खानचा सिनेमातील लूक समोर आलेला नाही. तर दुसरीकडे अभिषेक बच्चनचा सेटवरील एक फोटो लीक झाला आहे. यामध्ये तो अॅक्शन अवतारात दिसत आहे. बॅकग्राऊंडला अक्राळ विक्राळ डोंगर आणि समोर अभिषेक एका वाहनवार उभा दिसत आहे. त्यानेस काळ्या रंगाच्या शर्टवर लांब ग्रे रंगाचा ओव्हरकोट घातला आहे आणि त्याच्या हातात बंदूक आहे. तर आणखी एका फोटोत कार अपघाताचा सीन दिसत आहे.
#AbhishekBachchan 😈 First Official Internet Breaking Alert LEAKED LOOK Photos ⚠️ From #KING 👑 Shoot On Sets In 2026❤️🔥#ABJr Full Fledge RAW & REAL First Look Reveal In #SiddharthAnand's Next PAN World Action Opus On #XMas Dec 24 2026 💯
— Shahabuddin Ahmed (SRKian) 2.0 🇮🇳 🇵🇸 (@Shahab2SRKian50) May 13, 2026
Its From CAR CRASH & CLIMAX Sequences💥 pic.twitter.com/CzoxMnSNMI
या फोटोंवरुन अभिषेक बच्चन शाहरुखच्या अपोझिट खतरनाक व्हिलन असणार हे निश्चित झालं आहे. तर सोशल मीडियावर मात्र वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. एकाने लिहिले, 'हा तर करण अर्जुनमधला ठाकूर दुर्जन सिंह सारखा दिसत आहे','हा काय वेडेपणा सुरु आहे..किंगची संपूर्ण स्टार कास्ट लीक होत आहे. हे प्रमाण आणखी वाढण्याआधीच थांबवा','या अभिषेकमुळे पूर्ण सिनेमाची व्हाइबच घालवली आणि हा काय पांचट लूक आहे, कोणी अप्रूवल दिलं?' या कमेंट्समुळे अभिषेक आतापासूनच ट्रोल होत आहे. तसंच अनेक युजर्स सिद्धार्थ आनंदला टॅग करत अभिषेक बच्चनच्या निवडीवर शंका उपस्थित करत आहेत.