"गौरी स्वभावाने खूप..."; आमिर खानचा भावुक खुलासा, म्हणतो- "कुठेतरी माझ्या मनात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 09:52 IST2026-04-29T09:49:00+5:302026-04-29T09:52:09+5:30
एका मुलाखतीत आमिरने त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटबद्दल भावुक खुलासा केला आहे. काय म्हणाला आमिर?

"गौरी स्वभावाने खूप..."; आमिर खानचा भावुक खुलासा, म्हणतो- "कुठेतरी माझ्या मनात..."
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. आमिरची निर्मिती असलेला 'एक दिन' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात आमिरचा लेक जुनैद खान आणि साऊथ अभिनेत्री साई पल्लवी प्रमुख भूमिकेत आहे. लेकाच्या या नवीन सिनेमाचं आमिर खान तगडं प्रमोशन करताना दिसतोय. अशातच एका मुलाखतीत आमिरने त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटबद्दल भावुक खुलासा केला आहे. काय म्हणाला आमिर?
नुकत्याच एका मुलाखतीत आमिर खानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने खुलासा केला. गौरीसोबतचं रिलेशनशिप त्याला भावनिकदृष्ट्या कसं बदलत आहे, याविषयी आमिर खानने भाष्य केलं. तो म्हणाला, ''मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की माझी आणि गौरीची भेट झाली आणि आमचे नाते सुरू झाले. ती स्वभावाने खूप चांगली आहे आणि तिच्यासोबत मला खूप मानसिक शांतता मिळते.''
''किरण राव आणि रीना दत्ता यांच्यासोबतही माझे नातेही खूप खोल होते, पण काही कारणांमुळे ते टिकू शकले नाही. पण मी स्वतःला नशीबवान समजतो गौरी माझ्या आयुष्यात आली. आम्ही दोघेही एकत्र खूप आनंदी आहोत. मला वाटते की, आता कुठेतरी माझ्या मनात पूर्णत्वाची भावना निर्माण झाली आहे.", अशा पद्धतीने आमिरने गर्लफ्रेंडच्या नात्याबद्दल खुलासा केला. आमिरने याआधी रीना दत्ता आणि दिग्दर्शिका किरण राव यांच्याशी लग्न केलं होतं. परंतु काही वैयक्तिक कारणामुळे ते एकमेकांपासून वेगळे झाले. आता आमिर गौरीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.