Video: चालू इव्हेंटमध्ये आमिरला आला 'नेचर्स कॉल'; अभिनेता धूम ठोकून पळाला, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 09:04 IST2026-04-27T09:03:35+5:302026-04-27T09:04:55+5:30
या सिनेमाचा प्रमोशनल इव्हेंट नुकताच पार पडला. यावेळी आमिरसोबत एक मजेशीर प्रसंग घडला. इव्हेंट चालू असताना नेचर्स कॉल आल्याने आमिर धूम ठोकून पळून गेला. काय घडलं नेमकं?

Video: चालू इव्हेंटमध्ये आमिरला आला 'नेचर्स कॉल'; अभिनेता धूम ठोकून पळाला, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल
सध्या आमिर खानची निर्मिती असलेल्या 'एक दिन' सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमात आमिरचा मुलगा जुनैद खान आणि अभिनेत्री साई पल्लवी झळकणार आहे. साई पल्लवी आगामी 'रामायण' सिनेमातून झळकणार असली तरीही 'एक दिन' हा साईचा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे. या सिनेमाचा प्रमोशनल इव्हेंट नुकताच पार पडला. यावेळी आमिरसोबत एक मजेशीर प्रसंग घडला. इव्हेंट चालू असताना 'नेचर्स कॉल' आल्याने आमिर धूम ठोकून पळून गेला. काय घडलं नेमकं?
'एक दिन'च्या इव्हेंटला काय घडलं
काल सर्व कलाकार आणि टीमच्या उपस्थितीत 'एक दिन'चा इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये आमिर, साई, जुनैद आणि सिनेमाची इतर स्टारकास्ट उपस्थित होती. इव्हेंट सुरु असताना आमिर अचानक माईकवर एक वाक्य म्हणाला. ''यार मला... मी २ मिनिटांत येऊ का?'', असं म्हणत आमिरने करंगळीचं बोट दाखवून 'नेचर्स कॉल' आलाय असं सर्वांना सांगितलं. आमिरने माईक दुसऱ्या व्यक्तीकडे दिला आणि तो पळत मंचावरुन खाली उतरला आणि बाहेर गेला. अशाप्रकारे आमिरचा हा मजेशीर व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.
आमिरला त्याच्या 'एक दिन' सिनेमाबद्दल कमालीची महत्वाकांक्षा आहे. १ मे २०२६ रोजी 'एक दिन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून जुनैद खान आणि साई पल्लवी पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करणार आहेत. ही एक प्रेमकहाणी असून सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे. आमिर खानने या सिनेमाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे कालच्या इव्हेंटमध्ये आमिरसोबत त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटही उपस्थित होती.