भयानक हॉरर सिनेमा! एकट्याने पाहणाऱ्याला होतं १०,००० रुपयाचं बक्षीस, थिएटरबाहेर उभी असायची अॅम्ब्युलन्स, तुम्ही पाहिलात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 18:06 IST2026-05-16T18:04:20+5:302026-05-16T18:06:14+5:30
'हा' हॉरर चित्रपट एकट्याने पाहिला तर मिळायचे १० हजार रुपये, तुम्ही पाहिलात का?

भयानक हॉरर सिनेमा! एकट्याने पाहणाऱ्याला होतं १०,००० रुपयाचं बक्षीस, थिएटरबाहेर उभी असायची अॅम्ब्युलन्स, तुम्ही पाहिलात?
Bollywood Horror Cinema: हॉरर, रहस्यमय आणि गुढ कथानक असलेले सिनेमे लोक आवडीने पाहतात. आजकाल ओटीटीसह इतर डिजीटल प्लॅटफॉर्म्सवरही हॉरर चित्रपट ट्रेंडमध्ये आहेत. मात्र,असे काही चित्रपट आहेत जे तुम्हाला भीतीच्या भोवऱ्यात घेऊन जातात. अशाच एका चित्रपटाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
७० च्या दशकातील सर्वात मोठा हॉरर चित्रपट, जो एकट्याने पाहिला तर चक्क १० हजार रुपये मिळायचे. कोणता आहे हा चित्रपट? जाणून घेऊया. या चित्रपटाची सर्वात लक्षवेधी गोष्ट त्यांचं बजेट आणि शूटिंगची ठिकाणे असायची. या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे बदल घडत होते. एकीकडे कौंटुंबिक चित्रपटांचा बोलबाला असताना देखील हॉरर चित्रपटांनी क्रेझ निर्माण केली होती. अशाच एका चित्रपटासाठी निर्मात्यांनी एक अट ठेवली होती की, जो हा चित्रपट एकट्यानं पाहू शकेल, त्याला १० हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. एवढंच काय, तर चित्रपट इतका भयानक आहे की, थिएटरबाहेर रुग्णवाहिका उभी असायची. या चित्रपटाचं नाव ‘दरवाजा’ आहे. त्या काळामध्ये ही रक्कम खूप मोठी मानली जात होती. मात्र तरीही एकट्याने हा चित्रपट पाहण्याची हिंमत कोणीच दाखवली नाही. अगदीच कमी बजेट असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
दरम्यान, त्या वेळी, अनेकांनी 'दरवाजा'ला बी-ग्रेड चित्रपट म्हणून नाकारले होते, पण हीच ओळख पुढे त्याची सर्वात मोठी ताकद ठरली. या चित्रपटाची त्याकाळी मोठी चर्चा झाली होती. ‘दरवाजा’ या चित्रपटात अनील धवन, श्यामली, त्रीलोक कपूर, इम्तियाझ अली, साधना खोटे, दुलारी, अंजून महेंद्र, अलंकार जोसी, नझीर कश्मिरी, राकेश पांडेय हे कलाकार झळकले होते. हा चित्रपट आजही युट्यूबवर उपलब्ध आहे.