इंडोनेशियात झाला युवराज - हेजलचा साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:24 IST
भारतीय क्रिके ट संघाचा सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा युवराज सिंग व मॉडेल अभिनेत्री हेजल कीच या दोघांनीही लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडोनेशियात झाला युवराज - हेजलचा साखरपुडा
भारतीय क्रिके ट संघाचा सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा युवराज सिंग व मॉडेल अभिनेत्री हेजल कीच या दोघांनीही लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला आहे. इंडोनेशियामध्ये बाली येथे दिवाळीच्या दिवशी दोघांनी साखरपुडा केल्याची बातमी आहे. हरभजन-गीताच्या लग्नानंतर युवराज लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.युवराजचा साखरपुडा अतिशय गुप्तपणे पार पडला. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये हे दोघे लग्न करणार असल्याचे वृत्त आहे. युवराजने हरभजनला दिवाळीच्या शुभेच्छा देताना ही गोड बातमी शेअर केली. ती युवीच्या फॅन्सपर्यंत पोहोचताच त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. मागील अनेक महिन्यांपासून युवराज टीम इंडियातून बाहेर आहे. आता त्याने आयुष्याची नवी इनिंग खेळण्याची तयारी सुरू केली आहे.