शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

यंदाच्या दिवाळीत 'टेम्पल ज्वेलरी'ची हवा ! पारंपरिक दागिन्यांचीही जोरदार खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 17:58 IST

मागच्या वर्षी दागिन्यांमध्ये बाजीराव- मस्तानी चित्रपटाने भाव खाल्ला होता.यंदा मात्र दक्षिणेकडून महाराष्ट्रात नव्याने रूढ होऊ बघणाऱ्या 'टेम्पल ज्वेलरी'ची बाजारात हवा आहे.

पुणे : दिवाळी म्हटली की डोळ्यासमोर येतात ते नवनवे कपडे आणि दागिनेही. महागडे सोन्याचे दागिने घालून मिरवण्याची फॅशन केव्हाच मागे पडली असून सुरक्षिततेसाठी नकली किंवा एक ग्रॅमच्या दागिन्यांना स्त्रियांकडून पसंती दिली जात आहे. मागच्या वर्षी दागिन्यांमध्ये बाजीराव- मस्तानी चित्रपटाने भाव खाल्ला होता.यंदा मात्र दक्षिणेकडून महाराष्ट्रात नव्याने रूढ होऊ बघणाऱ्या 'टेम्पल ज्वेलरी'ची बाजारात हवा आहे.             कमळ, देवी, देवता, नाण्यांवर कोरलेले देवाचे आकार मिळून ठसठशीत अशी टेंपल ज्वेलरी बनते. दक्षिणेत पारंपरिक दागिने म्हणून प्रसिद्ध असणारी टेम्पल ज्वेलरी यावर्षी आपल्याकडेही आवर्जून घेतली जात आहे. पारंपरिक दृष्टीने बघायचे झाल्यास ही ज्वेलरी लाल रंगाच्या सोन्यामध्ये केली जाते.मात्र आपल्याकडे लाल किंवा ऑक्सिडाईज दागिन्यांपेक्षा पिवळ्याधमक रंगाच्या दागिन्यांना  मागणी आहे. त्यामुळे पिवळे टेम्पल दागिनेही बाजारात उपलब्ध आहेत.             मूळ टेम्पल सेटमध्ये दोन लहान आणि मोठी गळ्यातली, कानातले झुबे किंवा झुमके, कानाचे वेल, बांगड्या, बाजूबंद, कंबरपट्टा, मस्तकपट्टी,वेणीच्यावरचा पट्टा, बिंदी, अंगठी अशा भरगच्च गोष्टींचा समावेश असतो.मात्र या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्याही मिळत असल्याने तुम्हाला हवे ते निवडण्याचा पर्याय आहेत.

कुंदनच्या दागिन्यांना मागणी ऐतिहासिक चित्रपट किंवा राजस्थानमध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्वेलरीत अधिक वापरण्यात आलेल्या कुंदन वापरून केलेल्या दागिन्यांनाही चांगली मागणी आहे. या दागिन्यांची किंमत साधारण १५० रुपयांपासून तर १० हजारपर्यँत आहे. एखाद्या साडी किंवा ड्रेसवर मोठे कुंदनचे झुमके घातले तरी पुरेसे होत असल्याने एखादा तरी कुंदनचा सेट घेण्याकडे मुलींचा कल असतो.  

चिंचपेटी, ठुशी, नथ आजही हिटकेवळ सिनेमाशी निगडीत नव्हे तर पारंपरिक दागिनेही यंदाच्या दिवाळीत हिट आहेत. विशेषतः चिंचपेटी, ठुशी, नथ यांना तरुणींकडून आवर्जून मागणी आहे. हे दागिने अगदी १०० रुपयांपासूनच्या रेंजमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. 

टॅग्स :DiwaliदिवाळीtulsibaugतुळशीबागGoldसोनं