शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
3
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
4
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
5
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
6
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
8
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
9
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
10
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
11
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
12
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
13
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
14
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
15
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
16
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
17
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
18
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
19
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
20
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?

मुलींच्या जीन्सचे खिसे मुलांच्या जीन्सपेक्षा लहान का असतात? जाणून घ्या फॅशन डिझायनर कडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 21:00 IST

आजकालच्या समानतेच्या जगात महिला आणि पुरुष दोघांसाठी जीन्स तयार करणाऱ्या कंपन्या महिलांच्या जीन्सच्या खिशाबाबत दुजाभाव का करतात हे गौडबंगालच आहे. याचं उत्तर एका फॅशन डिझायनरकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जीन्सची पॅंट (Jeans Pant) आता बहुतांश सर्वांच्याच कपड्यांमधील अविभाज्य घटक असते. कोणी जीन्स वापरत नाही असं फार क्वचित आढळतं. स्त्री असो वा पुरुष, सर्व जण जीन्स वापरतात. जिन्सची ही फॅशन (Fashion) आता आपल्याकडे चांगलीच रुजली असून, गेल्या काही काळापासून जीन्सची जागा कोणीही घेऊ शकलेलं नाही.

आरामदायी पोशाख म्हणून मुली, महिलाही अगदी सर्रास जीन्स घालतात. मुलींच्या जीन्सचे वेगवेगळे प्रकार आता बाजारात दिसतात; मात्र एक गोष्ट कायम दिसते ती म्हणजे मुलींच्या जीन्सचा खिसा (Jeans Pocket in Smaller size) मुलांच्या जीन्सच्या खिशापेक्षा नेहमी लहान असतो. यामुळे मुलींना मुलांप्रमाणे जीन्सच्या खिशात मोबाइल, पाकीट, गाडीची किल्ली अशा वस्तू ठेवता येत नाहीत.

याबाबत अनेकदा चर्चा होत असते; मात्र गेल्या अनेक वर्षांत यात काही बदल झालेला दिसून येत नाही. आजकालच्या समानतेच्या जगात महिला आणि पुरुष दोघांसाठी जीन्स तयार करणाऱ्या कंपन्या महिलांच्या जीन्सच्या खिशाबाबत दुजाभाव का करतात हे गौडबंगालच आहे. याचं उत्तर एका फॅशन डिझायनरकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जवळपास १० वर्षांहून अधिक काळ फॅशन डिझाइन या क्षेत्रात असलेल्या एमिली केलर (Emily Keller) यांनी यामागचं रहस्य उलगडून सांगितलं आहे. यामागची तीन प्रमुख कारणं त्यांनी सांगितली. यातलं पहिलं कारण म्हणजे पैसे वाचवणं, दुसरं म्हणजे फॅशन ट्रेंड आणि तिसरं म्हणजे खिशाचा भाग स्ट्रेच होण्याची भीती.

यातलं पहिलं कारण अधिक महत्त्वाचं आहे. कारण मुलींच्या जीन्सचे खिसे लहान ठेवण्यातूनदेखील कंपन्यांना भरपूर नफा होतो. त्यामुळे अनेक नामांकित कंपन्यादेखील महिलांच्या जीन्सला लहानसा खिसा देऊन कॉस्ट कटिंग (Cost Cutting) करतात आणि पैसे वाचवतात. त्यासाठी कारण मात्र फॅशनचं दिलं जातं; मात्र मुख्य उद्देश कपडा वाचवणं हा असतो. या लहानशा खिशामुळे जीन्सकरिता लागणारं कापड मोठ्या प्रमाणात वाचतं. त्यामुळे कंपन्यांना चांगलाच फायदा होतो.

दुसरं कारण म्हणजे फॅशन ट्रेंड. आजच्या फॅशन ट्रेंडनुसार (Fashion Trend) महिलांच्या जीन्स बॉडी फिट (Body Fit) असतात. त्यामुळे खिसा दिला तर कपड्याची जाडी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे महिलांच्या जीन्सचे खिसे लहान ठेवण्यात येत असल्याचं फॅशन डिझायनर एमिली केलर यांनी सांगितलं; मात्र खिसा अतिशय लहान असल्यानं मुलींना, महिलांना खिशात काही वस्तू ठेवण्याची सुविधा मिळत नाही.

खिसा लहान ठेवण्यामागचं तिसरं कारण म्हणजे खिशाचा भाग स्ट्रेच (Strech) होण्याची भीती. महिलांच्या जीन्सला मोठा खिसा केला गेला, तर ते कापड खूपच स्ट्रेच होतं आणि ते चांगलं दिसत नाही. त्यामुळे खिसा लहान ठेवला जातो, असं एमिली केलर यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :fashionफॅशनJara hatkeजरा हटके