विंड चाईम विकत कशाला आणता? घरीच बनवा की! एकदम सोपं आहे.
By Admin | Updated: May 22, 2017 18:43 IST2017-05-22T18:42:58+5:302017-05-22T18:43:45+5:30
संगीताचा वेगळा आनंद तुम्हाला घरात विंड चाईमपासून मिळतो. शिवाय घर सजावटीतही याचा हातभार लागतो. हे विंड चाईम तुम्ही घरी सहज बनवू शकता.

विंड चाईम विकत कशाला आणता? घरीच बनवा की! एकदम सोपं आहे.
- सारिका पूरकर गुजराथी
संगीत... मानवी जगण्याला, समाधान, उत्साह, प्रेरणा, चेतना, उमेद, जिद्द देणारी कला. संगीत या कलेतील हीच ताकद आपण दररोज अनुभवत असतो. पण ती केवळ हेडफोन, आयपॉडवर गाणी ऐकून. पण याव्यतिरिक्त संगीत चराचरात भिनलेलं आहे, त्याचाही आस्वाद घ्यायला हवा, नाही का? संगीताचा असाच वेगळा आनंद तुम्हाला घरात विंड चाईमपासून मिळतो. कारण हवेची झुळूक आल्यावर या विंडचाईममधून जे सुमधूर स्वरतरंग उमटतात ते खूपच आल्हाददायक, मंद-धुंद करणारे असतात. फेंगशूई वास्तुशास्त्रातील विंड चाईम हा प्रकार आता भारतातही लोकप्रिय झाला आहे. वास्तुशास्त्राचे माहित नाही पण कलाप्रेमी, संगीतप्रेमींसाठीही विंडचाईम हा प्रकार खूप छान आहे. शिवाय घर सजावटीतही याचा हातभार लागतो. हे विंड चाईम तुम्ही घरी सहज बनवू शकता.
चाव्यांचे विंड चाईम
घरात वापरात नसलेल्या काही चाव्या असतील तर गोळा करुन ठेवा. गंजल्या असतील तर सॅण्डपेपरनं घासून, धुवून कोरड्या करा. या चाव्यांना आकर्षक रंगात रंगवून घ्या. आकर्षक रंगाची जाड लोकर घेऊन चावी बांधून घ्या. लोकरीची उंची जरा जास्त हवी. खराब झालेली कूकरची रिंग घेऊन त्यावरही लोकर, सुतळी गुंडाळून घ्या. आता विविध आकाराच्या चाव्या लोकरीच्या सहाय्यानं रिंगवर वर्तुळाकार बांधून घ्या. यातून एकदम मस्त कलरफूल विंड चाईम तयार होईल.