- मोहिनी घारपुरे - देशमुखफॅशन करायची म्हणजे काहीतरी विचित्र बटबटीत करायचं असं अजिबातच नाही. एकंदर व्यक्तिमत्त्वाला जे शोभून दिसेल, ज्या कपड्यांतून आपलं व्यक्तिमत्व उठून दिसेल अशा प्रकारच्या कपड्यांची निवड करणं हे फॅशनचं बेसिक प्रिन्सिपल विसरून चालणार नाही. त्यामुळेच फॅशन जगतात सिम्पलीसिटीलाही तितकच महत्त्व देण्यात आलं आहे.उत्तम प्रतीच्या कापडापासून आकर्षक पद्धतीनं शिवलेले साधे कपडेही अनेक प्रसंगांना ग्रेसफुल दिसतात. सहज सुंदर वावर करणाऱ्या मुलींची चॉईस म्हणूनच अनेकदा असे सिंपल सोबर कपडे असतात. अलिकडे जीन्सवर असे सिंपल हाय कॉलर्ड फॉर्मल शर्ट किंवा आॅफ शोल्डर टॉप्स घालण्याचीही फॅशन आहे. तसंच जराशा मोठ्या वयाच्या स्त्रियांमध्ये प्लेन फॅब्रिकच्या आणि जरीची बॉर्डर असलेल्या साड्या नेसण्याचा ट्रेण्ड असल्याचंही विशेषत्वानं दिसून येतं. या ट्रेण्डला नामांकीत नट्याही अपवाद नाहीत हे विशेष.
जॉर्जेट, शिफॉन,क्रेप , कॉटन, वेल्वेट अशा कापडांच्या एकाच रंगाच्या साड्यांना अत्यंत आकर्षक अशा बॉर्डर लावून एक वेगळीच ग्रेस देण्यात येते. या साड्या लहानसहान प्रसंगी नेसल्या तर फारच शोभून दिसतात. तसंच अनेक तरूणींही आॅफीसला किंवा कॉलेजला जाताना या कापडांपासून बनवलेले ब्रँडेड शर्ट्स, टॉप्स, वनपीस ड्रेसेस घालण्यास पसंती देतात. मात्र असे कपडे हे ब्रँडेडच हवेत असा आग्रहदेखील आहे. ब्रँडेड प्लेन कपड्यांचं टेक्श्चर (पोत) कायमच चांगलं राहातो, त्यामुळे हे कपडे जास्त काळ टिकतात. सिंम्पल लूकचे सिंम्पल नियम* सिंपल लुक कॅरी करताना आभुषणंही सिंपलच हवीत. तसं नसेल तर फारच बटबटीत लूक मिळेल. *सिंपल प्लेन साडी असेल तर त्या साडीशी कॉन्ट्रास्ट मॅच करतील अशी आभुषणं निवडावीत. शक्यतो साडीच्या बॉर्डरशी मॅच होतील अशी सिल्व्हर वा गोल्डन ज्वेलरी निवडावी. * जीन्स आणि प्लेन टॉप किंवा कॉलर्ड शर्ट असेल तर फॉर्मल लूक कॅरी करायला अशाच अँक्सेसरीज निवडाव्यात.* सिंम्पल कपड्यांवर चप्पल, फ्लिप फ्लॉप अजिबातच नको, त्याऐवजी जरा स्मार्ट सँडल्स, हायहील्स वगैरे वापरा. त्यानं संप्लिसीटीला चार चाँद लागतील. फक्त पायताणांची रंगसंगती फार बटबटीत नको एवढं लक्षात ठेवा.