‘वन वे तिकीट’च्या कॅमेऱ्यात सोनाली जेव्हा दिसते..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 20:59 IST
सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर या दोघी मराठी सिनेसृष्टीतल्या ग्लॅमरस नायिका एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान आमने सामने आल्या.
‘वन वे तिकीट’च्या कॅमेऱ्यात सोनाली जेव्हा दिसते..
सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर या दोघी मराठी सिनेसृष्टीतल्या ग्लॅमरस नायिका एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान आमने सामने आल्या. झाले असे की, अमृता खानविलकरच्या आगामी ‘वन वे तिकीट’ या सिनेमाच्या शूटिंग क्रुझवर तसेच इटली, स्पेन आणि फ्रान्स या ठिकाणीही चित्रीत करण्यात आले आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथे या सिनेमाच्या एका सीनचं चित्रीकरण सुरू होतं. नेमकं त्याच वेळी कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये एक ओळखीचा चेहरा दिसू लागला. हा चेहरा दुसरा तिसरा कुणाचा नसुन सोनाली कुलकर्णीचा होता. सोनाली कुलकर्णी त्यावेळी स्पेनमध्ये स्वत:च्या कामानिमित्त आली होती. परक्या देशात आपली माणसं दिसल्यावर सोनालीला त्यांना भेटण्याचा मोह आवरला नाही. यावेळी सोनालीने टीमसोबत भरपूर दंगा मस्ती केली. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.