फोटो अल्बममध्ये कशाला भिंतीवर लावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 16:03 IST2017-04-29T16:03:05+5:302017-04-29T16:03:05+5:30
जुन्या फोटोंना असं कुठेही दडवून ठेवण्यापेक्षा त्या फोटोंना हाताशी घेऊन त्यांच्यापासून काही क्रिएटिव्ह करुन पाहिलं तर. फोटोत जपून ठेवलेल्या आठवणी कायम डोळ्यासमोर राहतील असं बरंच काही तयार करता येतं.

फोटो अल्बममध्ये कशाला भिंतीवर लावा!
- सारिका पूरकर-गुजराथी
डिजिटल कॅमेऱ्याच्या तसेच स्मार्ट फोनच्या जमान्यात आणि सेल्फीच्या टे्रण्डमध्ये फोटोजच्या हार्ड कॉपीज काढण्याचं प्रमाण कमी झालंय हे खरं. मात्र अल्बम बनवण्याची हौस अजूनही आहे. म्हणूनच लग्नसमारंभ, वाढदिवस याकाळात काढलेल्या फोटोजचे अल्बम आवर्जून बनवले जातात. शिवाय कुठे प्रेक्षणीय स्थळी फिरून आल्यानंतर तिथे काढलेल्या फोटोंचेही आवडीनं अल्बम केले जातात आणि आल्या गेलेल्यांना कौतुकानं दाखवलेही जातात. तसेच घरात आई-बाबांच्या काळातील, तसेच आपल्या लहानपणीचे बरेच फोटोज असतात. अशा जुन्या फोटोंचेही अल्बम असतात. अल्बम हौसेनं बनवले जातात, बऱ्याचवेळा ते उघडून पाहिले आणि दाखवलेही जातात. पण एकदा का त्यातलं अप्रूप आणि कौतुक संपलं तर मग हे अल्बम कपाटात कोंडून ठेवल्यासारखे राहतात. जुन्या फोटोंना असं कुठेही दडवून ठेवण्यापेक्षा त्या फोटोंना हाताशी घेऊन त्यांच्यापासून काही क्रिएटिव्ह करुन पाहिलं तर. फोटोत जपून ठेवलेल्या आठवणी कायम डोळ्यासमोर राहतील असं बरंच काही तयार करता येतं.
आपले फोटो, तसेच मासिक आणि वर्तमानपत्रात आपल्याला आवडलेले, जपून ठेवावेसे वाटणारे फोटोही यासाठी वापरता येतात. अट मात्र एकच, या फोटोंचा कागद मात्र गुळगुळीत हवा.