शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

​VALENTINE DAY SPECIAL : प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असत...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 16:52 IST

फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हटले जाते कारण प्रेमवीरांचा उत्सव ‘व्हॅलेंटाइन डे’ याच महिन्यात १४ फेबु्रवारीला संपूर्ण जगात साजरा केला जातो.

-Ravindra Moreफेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हटले जाते कारण प्रेमवीरांचा उत्सव ‘व्हॅलेंटाइन डे’ याच महिन्यात १४ फेबु्रवारीला संपूर्ण जगात साजरा केला जातो. प्रेमी या दिवसाची तयारी मोठ्या उत्साहात करीत असतात. कारण याच दिवशी दोन्ही प्रेम करणारे आपले प्रेम व्यक्त करतात. मात्र काही जणांचे प्रेम स्वीकारले जाते तर काहींचे नाकारले जाते.* काय आहे प्रेमाची परिभाषाखरे प्रेम शब्दात व्यक्त करता येत नाही आणि त्याची तशी कोणतीच परिभाषाही नाही. प्रेमाची फक्त जाणिव केली जाऊ शकते. हा एक असा सुंदर आभास आहे जो दोन लोकांना अतुट नात्यात बांधत असतो. हे एक असे नाते आहे जे अंतकरणापासून जपले जाते. प्रेम कुणावरही सहज होऊ शकते मात्र सहज लुप्त होऊ शकत नाही. प्रेमाची त्याच व्यक्तिला जाणिव असते जो खऱ्या मनाने कुणावर तरी प्रेम करीत असेल. प्रेमाची कोणतीच भाषा नसते. ते शब्दविहीन असते. प्रेमाला फक्त मनाचा आवाज ऐकू  येतो. ह्रदयाच्या ठोक्यांची स्पंदने समजतात. प्रेम एक समर्पण आहे ज्याने मनुष्य संपूर्णपणे समर्पित होतो, प्रेम असे त्याग आहे ज्यामुळे मनुष्य जगातली सर्व संपत्तीला ठोकर मारु शकतो, प्रेम अशी तपस्या आहे ज्यात मनुष्य आपले सर्व सुख, सर्व ऐषोआराम आपल्या प्रेमासाठी बलीदान करतो. प्रेमात अशी ताकद असते की जेव्हा कुणावर प्रेम होते तर प्रेम मिळविण्यासाठी तो सातसमुद्र पार करुन येतो, प्रेमात ती ताकद आहे की सर्व बंधने तोडून प्रेमासाठी सर्व जगाशी लढू शकतो. प्रेमाची व्याप्ती खूप मोठी आहे. प्रेम फक्त प्रेमी-प्रेमिकापर्यंत मर्यादित नाही. प्रेम कुणावरही होऊ शकते, त्यात वयाचेही बंधन नसते, खरे प्रेम धर्म, जात, रंग, रुप, गरीब, श्रीमंत या गोष्टींना कधीही महत्त्व देत नाही, प्रेम हे फक्त प्रेम आहे. प्रेम मनुष्याच्या विचारसरणीला सकारात्मक बनवते. प्रेमात मनुष्य सहज आनंदी होतो, कुणाशी न बोलता सहज हसतो. प्रेम मनुष्याला जिंदादिल बनविते. प्रेम मनुष्याला जिवन जगण्याची कला शिकविते. प्रेमात ती ताकद असते ज्याने शत्रुही मित्र बनतो. मनुष्याजवळ कितीही संपत्ती असो, मात्र ज्याच्याजवळ खरे प्रेम नसेल तो कधीच आनंदी राहू शकत नाही. * खरे प्रेमखरे प्रेम कधीही कुणाला पाहिल्यावर होत नाही. खरे प्रेम तर एकमेकांना ओळखून आणि समजून होत असते. खऱ्या प्रेमात कोणतीच घाई नसते. यात तर दोघांचा समजुतदारपणा असतो, एकमेकांवरचा विश्वास असतो, एकमेकांविषयी आदर असतो, एकमेकांची जाणिव असते. खरे प्रेम फक्त एकाशीच होत असते आणि ते निरंतर असते. ते कधीही लोप पावत नाही कारण ते एकमेकांना समजून होत असते. खऱ्या प्रेमात लोक एकमेकांच्या मनापासून जुळलेले असतात, खऱ्या प्रेमात प्रतिबद्धता असते, जबाबदारीची जाणिव असते. खरे प्रेम करणारे जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू देत, मात्र ते मनाने, ह्रदयाने, आत्म्याने कायम जवळ असतात, एक मेकांसोबत असतात, एकमेकांशी जुळलेले असतात. खरे प्रेम रंग, रुप, सौंदर्य, कामवासना यापासून खूपच लांब असते. हे ते दोन आत्म्यांचे मिलन असते. खरे प्रेम कधी हार मानत नाही. जर त्याला त्याचे उद्दिष्ट नाही मिळाले तरी ते लोप पावत नाही, नष्ट होत नाही, मात्र चिरकाल टिकते. खºया प्रेमात एकमेकांच्या सुखाची काळजी घेतली जाते, सुखदु:ख आणि कठीण प्रसंगात कायम सोबत असतात आणि हेच नाते आयुष्यभर टिकविले जाते. जेव्हा एखाद्याला खरे प्रेम होते तेव्हा त्यांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांचे स्वप्ने एक होतात.  * प्रेम आणि आकर्षणात फरक आकर्षण (अस्थायी प्रेम) - यात पहिल्या नजरेत एखाद्याचा चेहरा आवडतो, कुणाचे डोळे आवडतात, कुणाची गप्पा करण्याची स्टाइल  आवडते किंवा एखाद्याचा व्यवहार आवडतो. याला पहिल्या नजरेचे प्रेम म्हणतात. शाळा, कॉलेजच्या दिवसात किंवा कमी वयात होणारे प्रेम हे आकर्षण असते ज्यात भावना तर प्रेमाच्याच असतात मात्र वय कमी असल्याने प्रेम व्यक्त करायला भीती वाटते. शिवाय जेव्हा आपल्या प्रेमाचा वेग खूप जलदगतीने वाढत असेल तर समजायचे की हे खरे प्रेम नसून एक आकर्षण आहे. आकर्षणाचे प्रेम लवकर सुरू होते आणि लवकर बरच काही मिळविण्याच्या प्रयत्नात लवकरदेखील लोप पावते. कधी कधी आकर्षण फक्त कामवासनासाठीदेखील असते, शिवाय त्यात फक्त देखाव्याचे प्रेम असते आणि ही आकर्षणता फक्त एकाशीच नसून ती बऱ्याचजणांकडून असते, असे प्रेम फक्त स्वार्थासाठी असते.  Also Read : ​प्रेमात गुलाबाचे महत्त्व वेगळेच!