शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

व्हॉटस्अ‍ॅपचे आगामी उपयुक्त फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 23:15 IST

येत्या काही काळात असेच अनेक एक्सायटिंग आणि उपयुक्त फीचर्स व्हॉटस्अ‍ॅपमध्ये दिसणार आहेत.

व्हॉटस्अ‍ॅप म्हणजे स्मार्टफोन यूजर्सचा जीव की प्राण. जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी संपर्काचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे व्हॉटस्अ‍ॅप. युजर्सच्या सुविधेसाठी कंपनी नेहमीच नवनवीन अपडेट्सच्या माध्यमातून नवे फीचर्स आणत असते. येत्या काही काळात असेच अनेक एक्सायटिंग आणि उपयुक्त फीचर्स व्हॉटस्अ‍ॅपमध्ये दिसणार आहेत. कोणते असणार ते फीचर्स? १. कॉल बॅकव्हॉटस्अ‍ॅप कॉलिंगची सुविधा उपलब्ध झाल्यापासून ‘कॉल बॅक’ची मागणी केली जात असे. अखेर नव्या 2.16.189 व्हर्जनमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे. जेव्हा कॉल रिजेक्ट केला जाईल तेव्हा अ‍ॅप स्क्रीनवर ‘कॉल बॅक’चे आॅप्शन दिसेल. अद्याप हे फीचर केवळ अँड्राईडसाठी असून ते फक्त व्हॉटस्अ‍ॅपच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.२. नवीन फॉण्टव्हॉटस्अ‍ॅपवर चॅट करताना तोच तोच फॉण्ट पाहून बोर झालात? तर मग तुमच्यासाठी नवी अपडेट फार सुखवणारी गोष्ट आहे. अँड्राईड यूसर्जसाठी कंपनीने दुसºया फॉण्टमध्ये लिहिण्याची सुविधा दिली आहे. हा नवीन फॉण्ट विंडोजच्या ‘फिक्सड्सिस’ सारखाच दिसतो. नवीन फॉण्ट वापरण्यासाठी टेक्स्टच्या आधी व नंतर तीनदा (`) हे चिन्ह वापरावे लागेल. ३. म्युझिक शेअरिंगव्हॉटस्अ‍ॅप लवकरच म्युझिक शेअरिंग फीचर देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याची सुरुवात अ‍ॅपल युजर्सपासून करण्यात येण्याची शक्यता आहे. या फीचरद्वारे आपल्या स्मार्टफोनमध्ये असणारे गाणे व अ‍ॅपल म्युझिक सर्व्हिसवरील गाणे यूजर्स एकमेकांशी शेअर करू शकतील.४. ‘मेन्शन’ आणि ग्रुप इन्व्हाइटफेसबुकप्रमाणेच आता व्हॉटस्अ‍ॅपवरही गु्रपमध्ये चॅट करत असताना ‘मेन्शन’ ही सुविधा देण्यात येणार आहे. गु्रपमध्ये एका विशिष्ट सदस्याला उद्देशून मेसेज पाठवताना त्याचे नाव ‘मेन्शन’ केले असता ते वेगळ्या रंगात दिसेल. ग्रुप इन्व्हाइट फीचरद्वारे तुम्ही इतर लोकांना ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी लिंक पाठवू शकता. लिंकवर क्लिक केले असता ते ग्रुपमध्ये अ‍ॅड होतील.५. जीआयएफआयओएस प्लॅटफॉर्मवर व्हॉटस्अ‍ॅपमध्ये लवकरच ‘जीआयएफ’ इमेजेस अपलोड केल्या जाऊ शकणार आहेत. आयओएस बीटा व्हर्जन 2.16.7.1 मध्ये हे फीचर सर्वप्रथम सामील करण्यात आले होते. स्पर्धक इस्टंट मेसेंजर वुईचॅट आणि लाईन या अ‍ॅप्समध्ये आगोदरच ही सुविधा आहे.६. मोठ्या आकाराच्या इमोजीपुढील अपडेटमध्ये मोठ्या आकाराच्या इमोजी देण्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अ‍ॅपलनेदेखील अशाच प्रकारची घोषणा आगामी आयओएस १० साठी केली आहे.