कपल्समध्ये वाद होण्याची क्षुल्लक कारणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:58 IST
पती-पत्नी असो वा नुकतेच प्रेमात पडलेले कपल्स असेा. त्यांच्यामध्ये या ना त्या कारणाने वाद होतातच. बर...
कपल्समध्ये वाद होण्याची क्षुल्लक कारणे
पती-पत्नी असो वा नुकतेच प्रेमात पडलेले कपल्स असेा. त्यांच्यामध्ये या ना त्या कारणाने वाद होतातच. बरं हे वाद सुरू होण्याला काही ठोस कारण असलेच पाहिजे असे काही नाही. अगदी क्षुल्लक आणि अवास्तव कारणांमुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होते.एका सर्वेक्षणात लोकांना त्यांच्या जोडीदाराशी कोणत्या क्षुल्लक आणि फुटकळ कारणांमुळे भांडण होते असे विचारण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितलेली काही मजेशीर कारणे..१. स्वप्नामध्ये त्याने/तिने मारले, चिडवले किंवा दुसऱ्याशी लगट केली तर सकाळी वाद होणारच म्हणून समजा.२. एकाने सांगितले की, माझी बायको एचडी चॅनेल असतानासुद्धा नॉन-एचडी चॅनेलच पाहते. त्यामुळे आमच्यात नेहमी वादावादी होते.३. डिशवॉशरचा वापर कसा करतात यावरूनही कपल्समध्ये भांडण होते.४. आठवड्याचा पहिला दिवस कोणता? रविवार की सोमवार? हे ठरविण्यासाठी तासन्तास वाद घातला जातो.५. टूथपेस्ट संपल्यावर पिळून पिळून बाहेर काढणे मुलींना आवडत नाही.६. हद्द म्हणजे तर शिंक आल्यावर कसा आवाज काढला यावरूनही दोघांमध्ये चांगलीच जुंपते.